जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / औरंगाबादेत बलात्काराचे सत्र सुरुच; दोन विवाहित महिलानंतर सोळा वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार

औरंगाबादेत बलात्काराचे सत्र सुरुच; दोन विवाहित महिलानंतर सोळा वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार

file photo

file photo

विवाहित महिलांवरील अत्याचारांच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी औरंगाबाद हादरलं आहे.

  • -MIN READ Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

अविनाश कानडजे, प्रतिनिधी औरंगाबाद, 8 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच औरंगाबाद जिल्ह्यातही गुन्हेगारीच्या, महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. यानंतर आता विवाहित महिलांवरील अत्याचारांच्या तीन वेगवेगळ्या घटनेने औरंगाबादेत खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिली घटना काय - विवाहित महिलांवरील अत्याचारांच्या तीन वेगवेगळ्या घटनांनी औरंगाबाद हादरलं आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिल्या घटनेत एका 29 वर्षीय विवाहित महिलेवर दीड वर्षांपासून अत्याचार केला जात होता. ही महिला फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीतील नायगाव येथील रहिवासी आहे. याप्रकरणी अत्याचार करणाऱ्या व्यक्तीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यद शफी असे आरोपीचे नाव आहे. फुलंब्री पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फुलंब्री पोलीस पुढील तपास करत आहे. दुसरी घटना काय - दुसऱ्या घटनेत विवाहित महिलेला धमकी देत महिलेवर बलात्कार करण्यात आला. तुझ्या लहान मुलीला मारुन टाकील अशी धमकी देत आरोपीने विवाहित महिलेवर बलात्कार केला. कन्नड-औरंगाबाद रस्त्यावरील पाणपोई फाटा येथील लॉजवर आरोपीने या महिलेसोबत दुष्कर्म करण्यात आले. सुधीर अनिल थेटे, असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्याविरोधात कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कन्नड शहर पोलीस पुढील तपास करत आहे. हेही वाचा -  जालन्यात आज मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक; आरक्षणाची पुढील दिशा ठरणार! तिसरी घटना काय -  यानंतर तिसऱ्या घटनेत, वाळुज महानगरात बलात्काराचे सत्र चालूच आहे. आता एका 16 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्काराची घटना घडली. आरोपींविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. वडगाव रामपुरी आणि सिडको वाळुज महानगर येथील बलात्कारांची घटना ताजी असतानाच वडगाव कोल्हाटी येथील 16 वर्षीय विद्यार्थिनीवर आरोपी कार्तिक उल्हास राठोड यांनी साजापुर येथील हॉटेलमध्ये नेऊन बळजबरीने बलात्कार केला. या घटनेनंतर पालकवर्गात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून आरोपी कार्तिक उल्हास याच्याविरुद्ध वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पंढरपूर बजाज नगर येथून एमआयडीसी वाळूज पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात