मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /दिवाळीसाठी आजोळी आला अन्...; बीडमध्ये एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत

दिवाळीसाठी आजोळी आला अन्...; बीडमध्ये एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत

अमर अनिल राडकर असं मृत पावलेल्या 17 वर्षीय मुलाचं नाव आहे. (फोटो- दिव्य मराठी)

अमर अनिल राडकर असं मृत पावलेल्या 17 वर्षीय मुलाचं नाव आहे. (फोटो- दिव्य मराठी)

Crime in Beed: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई याठिकाणी एका हृदय हेलावणारी घटना समोर आली आहे. फोटो काढण्याच्या नादात एका 17 वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत झाला आहे.

अंबाजोगाई, 12 नोव्हेंबर: बीड (Beed) जिल्ह्यातील अंबाजोगाई (Ambajogai) याठिकाणी एका हृदय हेलावणारी घटना समोर आली आहे. येथील नागनाथ मंदिरात देव दर्शनासाठी आलेल्या एका 17 वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत झाला आहे. संबंधित मुलगा आपल्या दोन मावसा भावांसोबत अंबाजोगाई येथील नागनाथ मंदिरात दर्शनासाठी आला होता. दर्शन घेतल्यानंतर, तिघेही फोटो काढण्यासाठी मंदिराजवळील धबधब्यावर (went at waterfall for click photos) गेले होते. पण पाण्याचा अंदाज न आल्याने संबंधित मुलाचा बुडून मृत्यू झाला (died by drowning into waterfall) आहे. आजोळी गेलेल्या एकुलत्या एक मुलाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अमर अनिल राडकर असं मृत पावलेल्या 17 वर्षीय मुलाचं नाव असून तो लातूर जिल्ह्यातील जोडजवळा येथील रहिवासी आहे. मृत अमर हा काही दिवसांपूर्वी दिवाळीनिमित्त केज तालुक्यातील आडस याठिकाणी आपल्या आजोळी आला होता. दरम्यान, बुधवारी दुपारी चो आपल्या दोन मावसभावांसह अंबाजोगाईच्या नागनाथ मंदिरात दर्शनासाठी आला होता.

हेही वाचा-तासाभराच्या अंतराने कपलने सोडला प्राण; जळगावात लव्ह स्टोरीचा हृदयद्रावक शेवट

दर्शन घेतल्यानंतर सायंकाळी 5 च्या सुमारास तिघेही मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या एका धबधब्याकडे फोटो काढण्यासाठी गेली. यावेळी फोटो काढण्यासाठी अमर पाण्यात उतरला. पण एका फोटोसाठी अमरचा जीव गेला आहे. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने अमरचा बुडून मृत्यू झाला आहे. अमरला वाचवण्यासाठी दोन्ही मावसभावांनी आरडाओरड केली. पण आसपास कोणीच नसल्याने त्यांच्या मदतीला कोणीच येऊ शकले नाहीत. वेळेवर मदत न मिळाल्याने अमरचा हृदयद्रावक शेवट झाला आहे.

हेही वाचा-तासाभराच्या अंतराने कपलने सोडला प्राण; जळगावात लव्ह स्टोरीचा हृदयद्रावक शेवट

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, अंबाजोगाई शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने रात्री साडेआठच्या सुमारास अमरचा मृतदेह बाहेर काढला आहे. अमरचा मृतदेह स्वाराती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आई वडिलांसाठी एकुलता एक असलेल्या अमरचा अशाप्रकारे अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Beed, Crime news