मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /संतापजनक! 28 वर्षीय तरुणीवर 4 जिल्ह्यात विविध ठिकाणी नेत बलात्कार; हातपाय बांधून दिल्या नरक यातना

संतापजनक! 28 वर्षीय तरुणीवर 4 जिल्ह्यात विविध ठिकाणी नेत बलात्कार; हातपाय बांधून दिल्या नरक यातना

बीड जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणीवर सांगलीतील एका युवकाने अत्याचाराचा कळस गाठला आहे. (File Photo)

बीड जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणीवर सांगलीतील एका युवकाने अत्याचाराचा कळस गाठला आहे. (File Photo)

Rape in Jalgaon: बीड जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणीवर सांगलीतील एका युवकाने अत्याचाराचा कळस गाठला आहे.

जळगाव, 29 सप्टेंबर: बीड जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणीवर सांगलीतील एका युवकाने अत्याचाराचा कळस गाठला आहे. नराधमाने पीडित तरुणीला विविध ठिकाणी नेत तिच्यावर अनेकदा बलात्कार (28 years old woman rape) केला आहे. एवढंच नव्हे तर आरोपीनं पीडितेचे हातपाय बांधून तिच्यावर अत्याचाराचा (Tied limb and raped) कळस गाठला आहे. पीडित तरुणीनं आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिल्यानंतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल (FIR Lodged) करण्यात आला आहे. पण अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नाही. या घटनेचा तपास पोलीस करत आहे.

संपत मल्हाड असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. तो सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील दरिबडची येथील रहिवासी आहे. आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवून पीडितेला जळगाव, पुणे, औरंगाबाद, पाळधी, मिरज येथील विविध लॉजवर नेत अत्याचार केला आहे. तसेच आरोपीने जळगावातील मैत्रिणीच्या रुमवर पीडितेचे हातपाय बांधून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले आहेत. आरोपीच्या सततच्या अत्याचाराला कंटाळून पीडितेनं याची माहिती आपल्या कुटुबीयांना दिली आहे.

हेही वाचा-पार्लरमध्ये घुसून विधवेवर 2तास अत्याचार; नाशकाला हादरवणाऱ्या घटनेतील नराधम गजाआड

पीडित तरुणी बीड जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून काम करते. तर 2016 साली ती उस्मानाबाद येथील एका महाविद्यालयात लेक्चरर म्हणून काम करत होती. दरम्यान पीडित तरुणी आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन सांगली जिल्ह्यातील जत येथे प्रशिक्षणासाठी घेऊन गेली होती. यावेळी तिची संपत मल्हाड नावाच्या तरुणाशी तिची ओळख झाली. यानंतर आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवत पीडितेवर वेळोवेळी बलात्कार केला. 2019 साली पीडित तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिला गर्भपात करण्यास देखील भाग पाडलं आहे.

हेही वाचा-दुकानात गेलेल्या मुलीसोबत शेजाऱ्याचं विकृत कृत्य; भयावह अवस्थेत आढळली चिमुकली

यानंतर आरोपीनं 2020 साली दुसऱ्याच एका तरुणीसोबत लग्न केलं. त्यामुळे पीडितेनं आरोपीसोबतचा संपर्क कमी केला. पण लग्न झाल्यानंतरही आरोपी पीडितेला ब्लॅकमेल करू लागला. दरम्यान त्याने पीडितेला औरंगाबाद याठिकाणी बोलवून तिच्यावर पुन्हा अत्याचार केला आहे. याप्रकरणी मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Jalgaon