जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / भाजप आमदार गणेश नाईकांसोबत 27 वर्ष लिव्ह इन रिलेशन, महिलेनं केला गुन्हा दाखल

भाजप आमदार गणेश नाईकांसोबत 27 वर्ष लिव्ह इन रिलेशन, महिलेनं केला गुन्हा दाखल

भाजप आमदार गणेश नाईकांसोबत 27 वर्ष लिव्ह इन रिलेशन, महिलेनं केला गुन्हा दाखल

एका महिलेनं जिवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी मुंबई, 16 एप्रिल : नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे नेते आणि आमदार गणेश नाईक ( BJP MLA Ganesh Naik ) अडचणीत सापडले आहे. एका महिलेनं जिवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल केल्यामुळे नवी मुंबईच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  सीबीडी पोलीस ठाण्यात दिपा चौहान या महिलेकडून गणेश नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मागील 27 वर्ष गणेश नाईकांचं महिलेसोबत लिव्ह ॲंन्ड रिलेशनशीप होते.  27 वर्ष संबंध असल्याचा सदर महिलेने आरोप केला आहे. ( हवाई प्रवास होऊ शकतो महाग, ATFची किंमत पोहोचली विक्रमी पातळीवर ) एवढंच नाहीतर लिव्ह ॲंड रिलेशनशीपमधून झालेल्या मुलाला गणेश नाईकांनी स्वीकारण्यास नकार देत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा महिलेनं गंभीर आरोप केला आहे. एवढंच नाहीतर मार्ग 2021 मध्ये गणेश नाईक यांनी सीबीडी येथील आपल्या कार्यालयामध्ये मला बोलावले होते. त्यावेळी गणेश नाईक यांनी डोक्यावर बंदूक ठेवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. अशी तक्रार या महिलेनं दिली आहे. ( देशी दारूच्या दुकानात वाहिला रक्ताचा पाट, दारूड्याने मॅनेजरच्या केला निर्घृण खून ) या महिलेनं नेरुळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसंच नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. परंतु, त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे पीडित महिलेनं महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहे. तर, गणेश नाईक यांची डीएनए चाचणी करावी अशी मागणीच शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात