Home /News /pune /

देशी दारूच्या दुकानात वाहिला रक्ताचा पाट, दारूड्याने मॅनेजरच्या डोक्यात घातली सिमेंटची विट

देशी दारूच्या दुकानात वाहिला रक्ताचा पाट, दारूड्याने मॅनेजरच्या डोक्यात घातली सिमेंटची विट

आरोपीने तिथं असणारी सिमेंटची विट त्यांच्या डोक्यात घातली आणि गळा दाबला

आरोपीने तिथं असणारी सिमेंटची विट त्यांच्या डोक्यात घातली आणि गळा दाबला

आरोपीने तिथं असणारी सिमेंटची विट त्यांच्या डोक्यात घातली आणि गळा दाबला.

धायरी, 16 एप्रिल : पुण्यात (pune) दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनामध्ये वाढ होता ना दिसत आहे.  देशी दारूच्या (liquor store) दुकानात बाटली दिली नाही म्हणून एका दारुड्याने देशी दारू दुकान व्यवस्थापकाच्या डोक्यात सिमेंटची वीट घालून हत्या केल्याची घटना  सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या (Sinhagad Road Police Station) हद्दीत घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  सिंहगड रस्त्यावरील शरद हॉस्पिटलच्या मागे प्रयेजा सिटी रस्त्यालगत असणाऱ्या देशी दारूच्या दुकानात  ही घटना घडली.  दिनकर सूर्यभान कोटमाळे (वय ४०) असे खून झालेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास घडली.  याप्रकरणी तौशिब रफिक शेख (वय 24,) याला सिंहगड रस्ता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (IPL 2022 : 'मी जबाबदारी घेतो', सलग 6 पराभवांनंतर रोहितची इमोशनल प्रतिक्रिया) सिंहगड रस्त्यावरील शरद हॉस्पिटलच्या मागे रामदास घुले व अरुण घुले यांचे देशी दारूचे दुकान आहे. या दुकानात दिनकर कोटमाळे हे व्यवस्थापक म्हणून काम करत होते.   शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आरोपी तौशिब शेख हा दारू पिण्यासाठी दुकानात आला होता. त्यावेळी   व्यवस्थापक दिनकर कोटमाळे यांच्यासोबत वाद झाला. या वादातून आरोपीने तिथं असणारी सिमेंटची विट त्यांच्या डोक्यात घातली आणि गळा दाबला. या झटापटीत कोटमाळे यांचा जागीच मृत्यू झाला. (मेहंदी सेरेमनी ते लग्नातील डान्सपर्यंत, रिद्धिमा कपूरने शेअर केले Unseen Photos) कोटमाळेंची हत्या केल्यानंतर आरोपी शेख हा पळून चालला होता.  पण सिंहगड रस्ता पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीस तत्काळ अटक केली.  घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून पाहणी केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या