मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

जितेंद्र आव्हाडांच्या बालेकिल्ल्याला पडणार भगदाड, तब्बल 22 नगरसेवक लागले शिंदे गटाच्या गळाला!

जितेंद्र आव्हाडांच्या बालेकिल्ल्याला पडणार भगदाड, तब्बल 22 नगरसेवक लागले शिंदे गटाच्या गळाला!

या 22 पैकी 6 नगरसेवक लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहे.

या 22 पैकी 6 नगरसेवक लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहे.

या 22 पैकी 6 नगरसेवक लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Thane, India

ठाणे, 24 जानेवारी : स्थानिक महापालिकांच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यात आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे शिवसेनेला खिंडार पडलेले असताना आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या बालेकिल्ल्यात मोठे भगदाड पडणार आहे. ठाण्यात राष्ट्रवादीचे तब्बल 22 नगरसेवक पक्षाची साथ सोडण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये आता राजकीय वातावरण तापायला लागले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष टार्गेटवर आला आहे. तब्बल 22 नगरसेवक राष्ट्रावादी पक्षाची साथ सोडणार अशी माहिती समोर आली आहे. हा गट वेगळा गट स्थापन करणार अथवा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार अशी शक्यता आहे. या 22 पैकी 6 नगरसेवक लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहे. हे 6 ही नगरसेवक दिग्गज आहे.

(दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, शिंदे, फडणवीस आणि अमित शहांच्या बैठकीत आता पंकजा मुंडेंची एंट्री!)

विशेष म्हणजे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना शह देण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची मोठी खेळी मानली जात आहे. मुंब्रा आणि कळवा येथील अनेक नगरसेवकांसह शेकडो NCP पदाधिकारी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वाटेवर आहे. ठाणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांची शिवसेना पक्ष इतर पक्षांना सुरुंग लावण्याच्या तयारीत आहे.

(धनुष्यबाण कुणाचे? 30 जानेवारीला निवडणूक आयोग देणार अंतिम निर्णय?)

विशेष म्हणजे, मध्यंतरी शिंदे गट आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये चांगलाच सामना रंगला होता. आव्हाड यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झाले होते. त्याचबरोबर त्यांना अटक सुद्धा करण्यात आली आहे. आव्हाड यांच्या गडाला सुरूंग लावण्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी काळात ठाण्यात मोठ्या घडामोडी घडणार आहे.

First published:

Tags: Thane