Home /News /maharashtra /

सातारा: लग्नासाठी तरुणानं केली हद्द पार, कॉलेजसमोरून 20 वर्षीय तरुणीचं अपहरण केलं अन्...

सातारा: लग्नासाठी तरुणानं केली हद्द पार, कॉलेजसमोरून 20 वर्षीय तरुणीचं अपहरण केलं अन्...

Crime in Satara: सातारा शहरातील धनंजय गाडगीळ कॉलेज परिसरात एक विचित्र घटना घडली आहे. या कॉलेजसमोर उभ्या असणाऱ्या एका वीस वर्षीय तरुणीचं एका बहाद्दराने भरदिवसा अपहरण केलं आहे.

    सातारा, 17 जानेवारी: सातारा (Satara) शहरातील धनंजय गाडगीळ कॉलेज परिसरात एक विचित्र घटना घडली आहे. संबंधित कॉलेजसमोर उभ्या असणाऱ्या एका वीस वर्षीय तरुणीचं एका बहाद्दराने भरदिवसा अपहरण (20 year old woman kidnap for marriage) केलं आहे. आरोपीनं 'तू आताच माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला सोडणारच नाही,' असं म्हणत पीडित तरुणीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून तिचं अपहरण केलं आहे. यानंतर आरोपी पीडित तरुणीला पुणे बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या डी मार्ट परिसरात घेऊन गेला. याठिकाणी पीडित तरुणी धावत्या दुचाकीवरून खाली पडली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित तरुणीनं सातारा शहर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी तरुणाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अपहरणासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रतीक संतोष गायकवाड असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव असून सातारा जिल्ह्यातील फलटण येथील रहिवासी आहे. तर 20 वर्षीय पीडित तरुणी ही सातारा शहरातील करंजे पेठेत राहते. दरम्यान, 6 जानेवारी रोजी पीडित तरुणी कॉलेजला गेली असता हा धक्कादायक प्रकार घडला आहे. हेही वाचा-संक्रांतीसाठी घरी आलेल्या लेकीला दिली आयुष्यभराची जखम; बापाचं कृत्य वाचून हादराल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारा, पीडित तरुणी घटनेच्या दिवशी 6 जानेवारी रोजी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास धनंजय गाडगीळ कॉलेजसमोर उभी होती. दरम्यान याठिकाणी आरोपी प्रतीक संतोष गायकवाड आपल्या दुचाकीवरुन येथे आला. त्याने युवतीला जबरदस्ती करत आपल्या दुचाकीवर बसवलं. यानंतर त्याने युवतीला 'तू आताच माझ्याशी लग्न कर, नाहीतर मी तुला सोडणारच नाही,' अशी धमकी दिली. हेही वाचा-एकटं राहणाऱ्या महिलेसोबत घडलं विपरीत, छातीत अन् डोक्यात गोळ्या घालून हत्या यानंतर आरोपीनं पीडित तरुणीला दुचाकीवर बसवून पोवई नाका, वाढेफाटा मार्गे पुणे बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या डी मार्टसमोर आणलं. याठिकाणी पीडित तरुणीनं दुचाकीवरून  पाय टेकवत खाली उतरण्याचा प्रयत्न केला. पण दुचाकी तशीच पुढे गेल्याने ती खाली पडली. या अपघातात तिच्या हाताला, पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित तरुणीने सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी आरोपीला अटक केली नाही. या घटनेचा तपास सातारा पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Kidnapping, Satara

    पुढील बातम्या