मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Quinoa For Weight Loss : वजन कमी करणाऱ्यांसाठी सुपरफूड मानलं जाणारं किनोआ काय आहे?

Quinoa For Weight Loss : वजन कमी करणाऱ्यांसाठी सुपरफूड मानलं जाणारं किनोआ काय आहे?

किनोआला "सर्व धान्यांची जननी" (Mother Of All Grains) म्हणूनही ओळखले जाते, अलीकडच्या काळात किनोआच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेदेखील (Shilpa Shetty) तिच्या युट्युब चॅनेलवर किनोआपासून बनवल्या जाणाऱ्या रेसिपी शेअर केल्या आहेत.

किनोआला "सर्व धान्यांची जननी" (Mother Of All Grains) म्हणूनही ओळखले जाते, अलीकडच्या काळात किनोआच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेदेखील (Shilpa Shetty) तिच्या युट्युब चॅनेलवर किनोआपासून बनवल्या जाणाऱ्या रेसिपी शेअर केल्या आहेत.

किनोआला "सर्व धान्यांची जननी" (Mother Of All Grains) म्हणूनही ओळखले जाते, अलीकडच्या काळात किनोआच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेदेखील (Shilpa Shetty) तिच्या युट्युब चॅनेलवर किनोआपासून बनवल्या जाणाऱ्या रेसिपी शेअर केल्या आहेत.

पुढे वाचा ...

मुंबई, 16 जुलै : सध्याच्या काळात लोक आपल्या आरोग्याबद्दल अधिकाधिक चिंतित होत आहेत. बरेच जण नेहमी आहाराच्या सवयी आणि अन्न निवडीसाठी एक चांगला उपाय शोधत असतात. किनोआ जे एक खाद्य बियाणे (Quinoa Is An Edible Seed) आहे, त्याला “सर्व धान्यांची जननी” (Mother Of All Grains) म्हणूनही ओळखले जाते. किनोआची लोकप्रियता अलिकडच्या वर्षांत खूप वाढली आहे. लोक वजन कमी करण्यासाठी क्विनोआ खाण्यास प्राधान्य देतात. कारण त्यामध्ये फायबर, वनस्पती-आधारित प्रोटीन असतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे ग्लूटेन-मुक्त आहे. 2017 च्या अभ्यासानुसार, दररोज 50 ग्रॅम किनोआ खाल्ल्याने ट्रायग्लिसराइड्स कमी होतात आणि लठ्ठ लोकांमध्ये पचनासंबंधित आजारांचा धोका कमी होतो.

किनोआ हे एक बियाणे आहे, धान्य नाही. परंतु त्याच्या पौष्टिकतेच्या (Quinoa Is A Superfood) दृष्टीने ते संपूर्ण धान्य मानले जाते. एक कप शिजवलेल्या किनोआमध्ये 222 कॅलरीज, 8.14 ग्रॅम प्रोटिन्स, 5.18 ग्रॅम फायबर, 3.55 ग्रॅम फॅट्स आणि 39.4 ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात. जाणून घेऊया किनोआ हे वजन कमी करण्यासाठी एक एक उत्तम आहार का मानला जात आहे.

हेही वाचा... पावसात बाईक चालवताना या 5 चुका करू नका, नाहीतर बेतू शकतं जीवावर

जीवनसत्त्वे

किनोआमध्ये आठ आवश्यक अमीनो अ‍ॅसिड, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम सारखी जीवनसत्त्वे असतात. किनोआमध्ये भरपूर लोह आणि व्हिटॅमिन बी 12 देखील असते. ऊर्जा उत्पादन आणि वजन कमी करण्यासाठी लोह आणि व्हिटॅमिन बी 12 दोन्ही आवश्यक आहेत.

कमी कॅलरीज

किनोआमध्ये कॅलरीजची संख्या कमी (Quinoa Has Low Calories) असते. किनोआ तुम्ही जास्त प्रमाणातही खाल्ला तर त्याचा दुष्परिणाम होत नाही. किनोआ, सॅलड किंवा भाज्या आणि बीन्स हे एक परिपूर्ण कमी-कॅलरी असलेले जेवण बनू शकते.

रिच-फायबर आहार

किनोआ हे सर्वोत्कृष्ट फायबर-समृद्ध (Quinoa Is Rich In Fiber) धान्यांपैकी एक मानले जाते. त्यामुळे जर तुम्ही जास्त फायबर असलेले पदार्थ शोधत असाल तर तुमच्यासाठी किनोआ हा उत्तम पर्याय असू शकतो. यामुळे तुमचे वजनदेखील कमी होईल.

हेही वाचा... लो-ग्लाइसेमिक इंडेक्स आहार हार्ट पेशंटचं वजन कमी करण्यासाठी आहे फायदेशीर - स्टडी

ग्लूटेन-मुक्त

किनोआ ग्लूटेन-मुक्त आहे (Quinoa Is Gluten-Free) आणि आपल्या आहारातील पौष्टिक आणि अँटिऑक्सिडंट मूल्य वाढविण्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे. जे लोक ग्लूटेन-मुक्त आहाराला प्राधान्य देतात ते किनोआचा पर्याय नक्की म्हणून वापरू शकतात.

कमी ग्लायसेमिक इंडेक्स

ग्लायसेमिक इंडेक्सद्वारे कार्बोहायड्रेट्सचा रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर कसा परिणाम हे मोजले जाते. किनोआचा ग्लायसेमिक इंडेक्स 35 कमी आहे (Quinoa Has Low Glycemic Index). याचा अर्थ ते मधुमेहींसाठी सुरक्षित आहे. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही.

तुम्हालाही तुम्हाला वजन कमी करण्याचा नैसर्गिक स्रोत हवा असेल तर तुमच्या आहारात किनोआचा समावेश नक्की करा.

First published:

Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle, Superfood, Weight, Weight loss