उल्हासनगर, 12 डिसेंबर : विकास कामाचा आणाभाका घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. पण उल्हासनगरमध्ये रस्त्याच्या श्रेयवादावरून शिंदे गटाचे समर्थकांमध्ये आपापसात जोरदार राडा झाला. दोन्ही गटांनी एकमेकांना अक्षरश: लाठ्या काठ्याने मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर जवळील एसएसटी कॉलेज समोर हा राडा झाला. व्हीनस चौक ते श्रीराम चौक असा सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यासाठी १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता.
शिंदे समर्थकांमध्ये आपआपसात राडा, रस्त्याच्या श्रेयावरून हाणामारी pic.twitter.com/Rxrk0p5xIs
— News18Lokmat (@News18lokmat) December 12, 2022
या रस्त्याच्या श्रेयावरून शिंदे गटातील कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माजी नगरसेविका विमल भोईर यांचा पती वसंत भोईर आणि युवसेना संपर्क प्रमुख विजय जोशी यांच्यात वाद होते. (चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या तरुणाचे खैरेंनी केलं अभिनंदन, म्हणाले….) आज दुपारी हे दोन्ही गट रस्त्याच्या कामाच्या पाहणीच्या निमित्ताने समोर समोर आले आणि रस्त्याच्या कामावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा टोकाला गेला की, त्याचं परिवर्तन हाणामारीत झालं. दोन्ही गटाकडून लाठ्या काठ्यांनी एकमेकांना मारहाण करण्यात आली, या हाणामारीत दोन जण जखमी झाले आहे. (‘हे कितपत शहाणपणाचं’, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना सल्लावजा टोला) काही बघ्यांनी हा हाणामारीचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. त्यानंतर हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच काम सुरू आहे. रस्त्याच्या कामावरून दोन गटात वाद दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील नरसी गावात रस्त्याच्या कामावरून दोन गटामध्ये वाद झाला. मुरुमाची रॉयल्टी का भरली नाही या मुद्द्यावर गावातील दोन गटात वादावादी झाली. या वादावादी जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार एका गटाने रामतीर्थ पोलिसांत नोंदवली. रामतीर्थ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. गावातील गटबाजीमुळे नरसी गावात सध्या तणावाचे वातावरण असून पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे.