मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीलाही खिंडार! सोलापुरातील 2 आजी-माजी आमदार भाजपच्या वाटेवर

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीलाही खिंडार! सोलापुरातील 2 आजी-माजी आमदार भाजपच्या वाटेवर

आता सोलापुरात राष्ट्रवादीला‌ मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे आणि मोहोळचे माजी आमदार राजन‌ पाटील  भाजपच्या वाटेवर असल्याचं समोर आलं आहे.

सोलापूर 25 जुलै : राज्यात शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे. शिवसेनेतील अनेक आमदारांनी केलेल्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. अशात आता महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेससाठीही चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. आता सोलापुरात राष्ट्रवादीला‌ मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे आणि मोहोळचे माजी आमदार राजन‌ पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचं समोर आलं आहे.

दानवे आणि खोतकरांमध्ये दिलजमाई, शिवसेनेच्या 'अर्जुनाने' शिंदे गटात टाकले पाऊल

दिल्लीत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट आहे. त्यामुळे, राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजन पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता या भेटीनंतर ते आपल्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब करणार का? याकडेच लक्ष लागलं आहे. राजन पाटील हे माजी आमदार आहेत. तर, बबनदादा शिंदे हे माढा मतदारसंघाचे आमदार आहेत.

माजी आमदार राजन पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यत्र शरद पवार यांचे जवळचे मानले जातात. शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी माजी आमदार राजन पाटील यांच्यासाठी बैठक घेतली होती. अशात आता राजन पाटील यांनी दिल्लीत जात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

दरम्यान, हे काही भाजपवरचे प्रेम नाही तर दबावामुळे आमदार भाजपमध्ये जात असल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटलं आहे. भाजप दबावतंत्र वापरत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दोन महिन्यांपूर्वीच बबन शिंदे यांना ईडीची नोटीस आली होती.

First published: