Home /News /maharashtra /

वाईटातून चांगलं घडल्याचा प्रकार! कोरोना झाल्यानं दोन माओवाद्यांनी केलं आत्मसमर्पण

वाईटातून चांगलं घडल्याचा प्रकार! कोरोना झाल्यानं दोन माओवाद्यांनी केलं आत्मसमर्पण

बरेच दिवस ब्लड प्लेटलेट्स कमी असतील तर, डॉक्टरकडे धाव घेण्याशिवाय पर्याय राहत नाही. सर गंगा राम हॉस्पिटलचे सीनियर कंसल्टंन्ट डॉक्टर अतुल गोगिया यांच्यामते कोरोनामधूव रिकव्हर झालेल्या काही रुग्णांमध्ये ब्लड प्लेटलेट्स खुप कमी म्हणजे 10,000-20,000 असल्याचं दिसून आलं आहे.

बरेच दिवस ब्लड प्लेटलेट्स कमी असतील तर, डॉक्टरकडे धाव घेण्याशिवाय पर्याय राहत नाही. सर गंगा राम हॉस्पिटलचे सीनियर कंसल्टंन्ट डॉक्टर अतुल गोगिया यांच्यामते कोरोनामधूव रिकव्हर झालेल्या काही रुग्णांमध्ये ब्लड प्लेटलेट्स खुप कमी म्हणजे 10,000-20,000 असल्याचं दिसून आलं आहे.

ज्याप्रमाणे वाईटातून चांगलं घडण्याचा प्रत्यय येतो तसाच काहीसा प्रकार याठिकाणी घडला आहे. गुरुवारी दंडकारण्यात कोरोनाची लागण झालेल्या दोन माओवाद्यांनी बस्तर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.

गडचिरोली, 14 मे: दोन दिवसापुर्वी दंडकारण्यात माओवादी (Maoist) चळवळीवर कोरोनाची (Coronavirus) दहशत पसरली होती. यामध्ये काही माओवाद्यांचा मृत्यू झाल्याचा दावा दंतेवाडा पोलिसांनी केला होता. अशा माहिती समोर आली होती की शंभरपेक्षा जास्त माओवाद्याना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान ज्याप्रमाणे वाईटातून चांगलं घडण्याचा प्रत्यय येतो तसाच काहीसा प्रकार याठिकाणी घडला आहे. गुरुवारी दंडकारण्यात कोरोनाची लागण झालेल्या दोन माओवाद्यांनी बस्तर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. अर्जुन ताती आणि लक्ष्मी पदा हे दोघे माओवादी कांकेर जिल्हयात जंगलात माओवादी चळवळीत सक्रिय होते. मात्र दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याने दोघांनी कांकेर पोलीसासमोर शस्त्रे टाकली आणि आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिंसानी त्यांना रुग्णालयात दाखल केले असुन तिथे दोन्ही माओवाद्यावर उपचार सुरू आहेत. बस्तरसह दंडकारण्यात गेल्या चाळीस वर्षांपासून माओवाद्यांच्या हिंसक कारवाया सुरू आहेत. माओवाद्यांना खरा धोका सुरक्षा दलापासून असतो यावेळी मात्र पहिल्यांदा जगाला धोक्यात आणलेल्या कोरोनाची झळ माओवाद्यांनी बसली होती. दंडकारण्यात बस्तरसह तेलंगाणा, ओरोसा, आंध्रप्रदेशसह गडचिरोली जिल्ह्याचा भाग येतो. घनदाट जंगलात वावरणाऱ्या माओवाद्यांना कोरोनाची लागण झाल्याचा दावा बस्तर पोलिसांनी केला होता. माओवाद्यांमध्ये कोरोनासोबत अन्नातून विषबाधा झाल्याने 10 माओवाद्यांचा मृत्यू झाल्याचा दावा बिजानुरचे पोलीस अधीक्षक यांनी केला होता. हे वाचा-देशात कोरोनाची दुसरी लाट येतीये आटोक्यात! रुग्णसंख्येत घट तर रिकव्हरी रेट वाढला माओवाद्यांचा वावर हा घनदाट जंगलात अतिदुर्गम भागात असतो. या भागात अनेक आदिवासी बहुल गावे आहेत, जिथे माओवाद्याची ये-जा सुरू असते. त्यामुळे  माओवाद्यांकडून स्थानिक आदिवासीमध्ये कोरोनाचा धोका वाढल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषत: माओवादी जी जनअदालत घेतात त्यात शेकडो नागरिक उपस्थित असतात. अशावेळी कुठल्याही सोशल डिस्टिंगचा वापर होत नसल्याने दुर्गम भागात गंभीर परिस्थिती उद्भभवु शकते. अनेक माओवादी नेते कोरोनाच्या गंभीर आजाराने ग्रस्त असून सुजातासारख्या जहाल महिला माओवादीचा त्यात समावेश असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
Published by:Janhavi Bhatkar
First published:

Tags: Corona, Corona hotspot, Corona spread, Coronavirus, Coronavirus cases

पुढील बातम्या