जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / Coronavirus in India: कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर! रुग्णसंख्येत घट तर रिकव्हरी रेट वाढला

Coronavirus in India: कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर! रुग्णसंख्येत घट तर रिकव्हरी रेट वाढला

कोरोनाची पहिली लाट (First Wave of Cororna) ओसरण्या आधीच दुसरी लाट सुरु झाली. दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची (Corona patient) संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यातच कोरोना बरोबर ब्लॅक फंगस (Black Fungus)चा धोकाही वाढलेला आहे. कोरोनानंतर आता ब्लॅक फंगसच्या केस संपूर्ण भारतामध्ये दिसू लागलेल्या आहेत.

कोरोनाची पहिली लाट (First Wave of Cororna) ओसरण्या आधीच दुसरी लाट सुरु झाली. दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची (Corona patient) संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यातच कोरोना बरोबर ब्लॅक फंगस (Black Fungus)चा धोकाही वाढलेला आहे. कोरोनानंतर आता ब्लॅक फंगसच्या केस संपूर्ण भारतामध्ये दिसू लागलेल्या आहेत.

गुरुवारी नवीन रुग्णांच्या संख्येपेक्षा अधिक लोक कोरोनातून बरे (Recovered from Corona) झाले आहेत. गुरुवारी 3 लाख 44 हजार 570 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 14 मे : देशातील कोरोना (Coronavirus in India) रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा घट (Corona Cases Decreases) आली आहे. गुरुवारी देशात 3 लाख 42 हजार 896 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे गुरुवारी नवीन रुग्णांच्या संख्येपेक्षा अधिक लोक कोरोनातून बरे (Recovered from Corona) झाले आहेत. गुरुवारी 3 लाख 44 हजार 570 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, मृतांच्या संख्येतही घट आली आहे. सध्या अॅक्टिव्ह रुग्णसंख्या (Active Corona Cases) 37 लाख 327 इतकी आहे. सर्वाधिक बाधित राज्यांमध्ये आटोक्यात आला कोरोना - गुरुवारी राजधानी दिल्लीमध्ये नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट आली आहे. दिल्लीमध्ये 10 हजार 489 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 308 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातही नवीन 42 हजार 582 रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 850 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, केरळमध्येही बुधवारच्या तुलनेत गुरुवारी रुग्णसंख्येत घट नोंदवली गेली आहे. इथे 39 हजार 955नवीन रुग्ण आढळले आहेत. तर, 97 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सरकारनं म्हटलं, की कोरोना पुन्हा समोर उभा ठाकण्याची शक्यता आहे. अशात राज्यांच्या मदतीनं राष्ट्रीय स्तरावर तयारी ठेवावी लागेल. कोरोनासंबंधी नियमांसोबतच आरोग्य सुविधाही वाढवाव्या लागतील. नीति आयोगाचे सदस्य व्ही के पोल म्हणाले, की ऑगस्ट ते डिसेंबरच्या ५ महिन्याच्या काळात देशात 200 कोटीहून अधिक कोरोना लसी उपलब्ध होतील. त्यांनी असंही सांगितलं, की रशियन लस स्पुतनिकदेखील पुढील आठवड्यापासून उपलब्ध होऊ शकते. देशाच कोरोनानं कहर घातलेला असतानाच आरोग्य सुविधांचा मोठा अभाव जाणवत आहे. या काळात इतर देशांनी मदतीचा हात पुढे करत भारतात मेडिकल साहित्य पाठवलं आहे. आजेदखील दोहा, कतर इथून विशेष विमानांच्या माध्यमातून भारतात मेडिकल सहाय्यता पाठवली जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात