अहमदनगर, 15 मे : देशात एकीकडे कोरोनाचा (Corona) कहर सुरू असतानाच आता नव्या बुरशीजन्य आजाराचे संकट आले आहे. अहमदनगर जिल्ह्यात काही दिवसांपासून म्युकरमायक्रोसिस (Mucormycosis ) म्हणजेच काळ्या बुरशीचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, जिल्ह्यात रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत असून 8 लागण झाली असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे.
म्युकरमायक्रोसिस हा आजार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये हा चर्चेत आला. कोरोनावर उपचार घेत असताना वापरलेले स्टुराईट किंवा इतर ड्रग वापली जातात. त्या नंतर कोरोनामुक्त झालेले रुग्ण हा बुरशीजन्य आजाराचा संसर्ग होत आहे. यामध्ये डोळे, कान, नाक मेंदूचे आजार प्रामुख्याने होत असतात. अहमदनगर जिल्ह्यात म्युकरमायक्रोसिस 8 रुग्ण सापडले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे.
6 रुग्णांवर शासकीय आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. म्युकरमायक्रोसिस या आजारावरील औषधे सुद्धा कमी आहेत. पुढील काळात याची संख्यात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे, असं जिल्हा शल्यचिकित्सक सुनील पोखरणा यांनी सांगितलं.
कल्याण-डोंबिवलीत दोघांचा मृत्यू
दरम्यान, कोरोनानंतर होणाऱ्या म्युकरमायकोसिस आजाराने कल्याण डोंबिवलीत दोन बळी घेतले आहेत. ठाणे ग्रामीणमधले म्हारळ भागातील 38 वर्षीय तरूण तुकाराम भोईर आणि डोंबिवली पूर्वेकडील एका 69 वर्षीय बाजीराव काटकर या नागरिकाचा म्युकरमायकोसिस आजारानं मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. डोंबिवलीतील एम्स या खाजगी रुग्णालयात या रुग्णांवर उपचार सुरु होते. दरम्यान, या आजाराने ग्रस्त असलेल्या आणखी 6 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
म्युकरमायकोसिस म्हणजे काय?
म्युकरमायकोसिस दुर्मिळ असला, तरी नवा नाही. प्रतिकारशक्ती (Immunity) कमी असलेल्या, अतिदक्षता विभागात (ICU) असलेल्या, तसंच अवयव प्रत्यारोपण (Transplantation) केल्या जाणाऱ्या रुग्णांमध्ये ब्लॅक फंगस (Black Fungus) म्हणजेच म्युकरमायकोसिस होणं तसंच त्यामुळे त्यांचा मृत्यू होणं अशा गोष्टी पूर्वीपासूनच घडत आहेत. पण कोविड-19 मुळे त्याची लागण होत असल्याची गोष्ट नवी आणि धोकादायक आहे, असं डॉक्टर्सचं म्हणणं आहे. कोविड-19 मधून चांगल्या पद्धतीनं बरं होत असलेल्या पेशंट्सना याची लागण होण्यामध्ये अचानक वेगाने वाढ होणं ही काळजीची बाब असल्याचं सांगितलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar, Ahmednagar News, अहमदनगर