मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

TET Exam Scam : टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तारांच्या 2 मुलींचंही नाव, प्रमाणपत्र रद्द

TET Exam Scam : टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तारांच्या 2 मुलींचंही नाव, प्रमाणपत्र रद्द

सायबर पोलीस आणि परीक्षा परिषद यांनी जी यादी प्रसिद्ध केली त्यामध्ये या दोघींच्या नावांचा समावेश आहे

पुणे 08 ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळा प्रकरणाचे लोण थेट सिल्लोडपर्यंत पोहोचलं आहे. परीक्षा परिषदेकडून जी यादी जाहीर करण्यात आली त्यामधील सर्व अपात्र असणाऱ्या लोकांनी पात्र होण्यासाठी सुपे यांना पैसे दिले होते. मात्र सुपे यांच्याकडून अपात्र उमेदवारांना पात्र असण्याचे सर्टिफिकेट मिळाले नाहीत. यात माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींचाही समावेश आहे. TET Exam Scam : टीईटी घोटाळ्यातील दोषींना दणका, 7 हजार 874 उमेदवारांना कायमची परीक्षा बंदी अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुली शिक्षिका असून 2020 मध्ये त्या अपात्र आहेत. सायबर पोलीस आणि परीक्षा परिषद यांनी जी यादी प्रसिद्ध केली त्यामध्ये या दोघींच्या नावांचा समावेश आहे.  सत्तार यांच्या मुलींनी कुठल्या एजंटला पैसे दिले हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे. माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची टीईटी प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहेत. या यादीमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील काही उमेदवारांचा समावेश असून यादी जाहीर झाल्यानंतर गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची नावेही समोर आलेली आहेत.  अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये सात शैक्षणिक संस्था असून या संस्थांमध्येच या मुलीही कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही मुली परीक्षेत अपात्र आहेत. टीईटीमध्ये गैरव्यवहार केलेल्या तब्बल 7 हजार 874 विद्यार्थ्यांच्या नावाची यादी परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आली आहे. या यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना टीईटीची परीक्षा देण्यास कायस्वरुपी प्रतिबंध करण्यात आला आहे.
First published:

Tags: Scam

पुढील बातम्या