Home /News /maharashtra /

TET Exam Scam : टीईटी घोटाळ्यातील दोषींना दणका, 7 हजार 874 उमेदवारांना कायमची परीक्षा बंदी

TET Exam Scam : टीईटी घोटाळ्यातील दोषींना दणका, 7 हजार 874 उमेदवारांना कायमची परीक्षा बंदी

टीईटीमध्ये गैरप्रकार केलेल्या 7 हजार 874 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

टीईटीमध्ये गैरप्रकार केलेल्या 7 हजार 874 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

टीईटीमध्ये गैरप्रकार केलेल्या 7 हजार 874 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

पुणे, 04 ऑगस्ट : टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात (TET Exam Scam case) आता दोषींना मोठा धक्का बसला आहे. टीईटी परीक्षा घोटाळ्यातील दोषींना कधीच परीक्षा देता येणार नाही. टीईटीमध्ये गैरप्रकार केलेल्या 7 हजार 874 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या सर्व उमेदवारांना आता बेकायदेशीर ठरवले आहे. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली होती. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरप्रकार केलेल्या उमेदवारांची यादी परीक्षा परिषदेने बुधवारी जाहीर केली. त्यानुसार ७ हजार ८७४ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांची टीईटीची प्रमाणपत्रे रद्द करण्यासह त्यांना या पुढील टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरुपी प्रतिबंध घालण्यात आला आहे.​ (खाकी वर्दीचं स्वप्न बघताय? 'या' टिप्स फॉलो कराच; एका प्रयत्नात क्रॅक होईल Exam) आरोग्य भरती परीक्षेतील गैरप्रकारांचा पुणे पोलिसांकडून तपास करण्यात येत असताना त्या तपासातून टीईटी घोटाळा उघड झाला होता. यात परीक्षा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी, परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपनीचे संचालक आणि उमेदवारांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. काय आहे नेमकं प्रकरण? पोलिसांनी म्हाडा पेपरफुटीचा सूत्रधार डॉ. प्रितीश देशमुख याच्या घराची झाडाझडती घेतली असता तेथे टीईटीचे 50 ओळखपत्र आढळून आले होते. याच्याकडे टीईटीच्या ते चाळीस आपात्र विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे मिळाली होती. टीईटीची परीक्षा 21 नोव्हेंबर रोजी झाली होती. टीईटीला परीक्षांसाठी साडेचार लाख विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. प्रश्नसूची आणि उत्तरसूचीमध्ये तफावत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. विद्यार्थ्यांच्या आक्षेपानंतर tet च्या परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात आलेली नाही. प्रितीश देशमुख याच्या घरी टीईटीची 50 ओळखपत्रे सापडल्याने टीईटी परीक्षेतही घोटाळा झाला का? असा सवाल उपस्थित होऊ लागला. त्यानंतर पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना चौकशीसाठी बोलावले. या चौकशीनंतर तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली होती. तुकाराम सुपे यांना 17 डिसेंबर 2021 रोजी पुण्यातील सायबर पोलिसांनी अटक केली होती. शिक्षक पात्रता परीक्षेत लाच घेऊन विद्यार्थ्यांना पास केल्याचा ठपका तुकाराम सुपे यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यानंतर मे महिन्यात सुपेला जामीन मिळाला.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या