अलिगढ, 02 ऑक्टोबर: एका नामांकित मेडिकल कॉलेज रुग्णालयात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका महिला रुग्णाला बाथरूममध्ये घेऊन जात, नराधमाने तिच्यावर अत्याचार केला आहे. पीडित महिला रुग्णालयातून अचानक गायब झाल्यानंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली होती. सुरक्षा रक्षकांनी पीडित महिलेचा शोध घेतला असता, रुग्णालयातील एका बाथरुममध्ये नराधम तिच्यावर बलात्कार करत (woman patient rape in hospital) असल्याचं आढळलं आहे. सुरक्षा रक्षकाने नराधम आरोपीला रंगेहाथ पकडलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या (Accused arrested) आहे.
संबंधित संतापजनक प्रकार उत्तर प्रदेशातील अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या (Aligrah muslim university) जेएन मेडिकल कॉलेजमध्ये (JN Medical College) घडली आहे. तर आरोपी तरुण हा रुग्णालयाशी संबंधित नसून तो पीडित महिलेला मदत करण्याच्या बहाण्याने येत होता. पीडित महिला मागील तीन महिन्यांपासून या रुग्णालयात उपचार घेत होती. पीडितेवर सध्या रिकव्हरी वार्डात उपचार सुरू होते. आरोपी तरुण हा पीडित महिलेची मदत करण्यासाठी वार्डात दररोज येत होता.
हेही वाचा-मैत्रिणीच्या मुलीला बर्थडेला नेलं अन्..; चिमुकलीच्या कौमार्याचा 40 हजारांत सौदा
दरम्यान शुक्रवारी आरोपीनं मदत करण्याच्या बहाण्याने पीडित महिलेवर बलात्कार केला आहे. पीडित महिला शुक्रवारी आपल्या कॉटवरून अचानक गायब झाली होती. या घटनेची माहिती डॉक्टरांना मिळल्यानंतर त्यांनी पीडितेची सर्वत्र शोधाशोध केली. तसेच सुरक्षा रक्षकांना याची माहिती दिली. सुरक्षा रक्षक महिलेचा शोध घेत जेव्हा बाथरूममध्ये पोहोचले, तेव्हा एक तरुण पीडितेवर बलात्कार करत असल्याचं सुरक्षा रक्षकानं पाहिलं.
हेही वाचा- मुंबईतील महिलेवर आध्यात्मिक बाबाकडून विकृत कृत्य; नराधमाला गुजरातमधून अटक
ही घटना उघडकीस आल्यानंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली. यानंतर मेडिकल कॉलेज प्रशासनानं तातडीनं या घटनेची माहिती पोलिसांना दिली. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Rape case, Uttar pradesh