औरंगाबादेत 15 वर्षीय मुलाचं 5 वर्षीय मुलीसोबत विकृत कृत्य; CCTV फुटेज पाहून वडिलही हादरले!

औरंगाबादेत 15 वर्षीय मुलाचं 5 वर्षीय मुलीसोबत विकृत कृत्य; CCTV फुटेज पाहून वडिलही हादरले!

Crime in Aurangabad: औरंगाबादमध्ये एका 5 वर्षीय चिमुकलीसोबत त्याच परिसरात राहणाऱ्या 15 वर्षीय मुलाने विकृत कृत्य केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 27 ऑक्टोबर: औरंगाबादमध्ये एका 5 वर्षीय चिमुकलीसोबत त्याच परिसरात राहणाऱ्या 15 वर्षीय मुलाने विकृत कृत्य केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपी मुलाने पीडित मुलीला सायकल खेळण्याचा बहाणा करत तिला दुसऱ्या कॉलनीत घेऊन गेला होता. याठिकाणी आरोपीनं पीडित मुलीसोबत घृणास्पद कृत्य केलं आहे. संबंधित सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही व्हिडीओ पाहून मुलाच्या वडिलांना देखील धक्का बसला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल (FIR lodged) केला असून आरोपी मुलाला ताब्यात (Accused minor boy arrested) घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

संबंधित घटना औरंगाबाद शहराच्या गारखेडा परिसरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 वर्षीय पीडित मुलगी सोमवारी साडे चारच्या सुमारास अपार्टमेंटसमोर सायकल खेळत होती. दरम्यान गारखेडा परिसरातील रहिवासी असणारा 15 वर्षीय आरोपी मुलगा तेथून फिरत होता. सायकल खेळणाऱ्या एकट्या मुलीला पाहून आरोपीनं नियत फिरली. आरोपीनं पीडित मुलीला सायकल खेळण्याच्या बहाण्याने गोड बोलून सायकलवर बसवलं आणि तिला शेजारच्या कॉलनीत घेऊन गेला.

हेही वाचा-संतापजनक! दुप्पट वयाच्या तरुणाशी लावला बालविवाह; काही दिवसातच मुलीचा भयावह अंत

याठिकाणी गेल्यानंतर आरोपी पीडित मुलीला दोन वाहनांच्या मध्ये घेऊन गेला. याठिकाणी आरोपीनं तिच्याशी अश्लील चाळे (minor girl sexual assault by 15 years old boy) करण्यास सुरुवात केली. याचवेळी समोरून एक महिला येताना पाहून आरोपीनं घटनास्थळावरून पळ काढला. पण आपल्यासोबत काहीतरी विचित्र प्रकार घडल्याने पीडित मुलगी घाबरली. यानंतर तिने भेदरलेल्या अवस्थेत संबंधित सर्व प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला. या घटनेची माहिती मिळताच पीडित मुलीच्या वडिलांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात आरोपी मुलाविरोधात फिर्याद दाखल केली.

हेही वाचा-चिमुकलीला पेरूच्या बागेत नेलं अन्..; 67 वर्षीय नराधमाच्या कृत्याने पुणे हादरलं!

या घटनेची माहिती आरोपी मुलाच्या वडिलांना कळाल्यानंतर त्यांना पहिल्यांदा विश्वासच बसला नाही. त्यांनी आपल्या मुलाची बाजू घेत, आरोप करणाऱ्यांवरच प्रश्नाचा भडिमार केला. पण पोलिसांनी संबंधित घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ आरोपी मुलाच्या वडिलांना दाखवल्यानंतर, त्यांना धक्काच बसला. मुलाने केलेलं कृत्य पाहून ते सुन्न झाले. मोबाइलच्या अतिरेक वापरातून मुलाने अशाप्रकारचं कृत्य केलं असावं, असं स्पष्टीकरण आरोपीच्या वडिलांकडून देण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपहरण, अत्याचार आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Published by: News18 Desk
First published: October 27, 2021, 12:35 PM IST

ताज्या बातम्या