प्राध्यापकाचा गळा चिरून हाताच्या कापल्या नसा; हत्येच्या विचित्र घटनेनं औरंगाबाद हादरलं!

प्राध्यापकाचा गळा चिरून हाताच्या कापल्या नसा; हत्येच्या विचित्र घटनेनं औरंगाबाद हादरलं!

Murder in Aurangabad: औरंगाबाद शहरात एका प्राध्यापकाची राहत्या घरात गळा चिरून निर्घृण हत्या (Professor murder by slit throat) करण्यात आली आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 11 ऑक्टोबर: औरंगाबाद शहरातील एका महाविद्यालयात शिकवणाऱ्या प्राध्यापकाची राहत्या घरात गळा चिरून निर्घृण हत्या (Professor murder by slit throat) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज पहाटे औरंगाबाद शहरातील सिडको एन 2 भागात ही खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. डॉ. राजन हरिभाऊ शिंदे असं खून झालेल्या प्राध्यापकाचं नाव आहे. मागील बारा तासांत औरंगाबाद शहरात खुनाची दुसरी घटना समोर आली आहे. या दोन्ही घटनांमुळे औरंगाबाद शहर पुन्हा एकदा हादरून गेलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्राध्यापक डॉ. राजन शिंदे हे औरंगाबादमधील मौलाना आझाद महाविद्यालयात इंग्रजी विषय शिकवतात. आज पहाटे त्यांचे कुटुंबीय झोपेतून उठले असता, प्राध्यापक शिंदे हे घरातील हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले आहे. ही घटना समोर येताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच हादरली आहे. यानंतर कुटुंबीयांनी याची माहिती सिडको पोलिसांना दिली आहे.

हेही वाचा-रात्री कुटुंबीयांसोबत शेवटचं जेवला अन् सकाळी आढळला मृत; मनाला चटका लावणारी घटना

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. विशेष म्हणजे घरातील कोणतंही साहित्य चोरीला गेलेलं नाही. त्यामुळे प्राध्यापकाची हत्या नेमक्या कोणत्या कारणातून झाली, याचा तपास करणं पोलिसांसमोर आव्हान आहे. मारेकऱ्यांनी मृत प्राध्यापकाचा गळा चिरून त्यांच्या हाताच्या नसा कापल्या आहेत. रात्रभर झालेल्या रक्तस्त्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे.

हेही वाचा-चिमुकल्या लेकींसमोर आईनं तळतळत सोडला प्राण; देवीच्या दर्शनासाठी जाताना आलं विघ्न

खरंतर, मागील काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात खून होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं पोलिसांसमोर एक आव्हान निर्माण झालं आहे. दरम्यान काल रात्री औरंगाबाद शहरातील बजरंग चौकात दारूच्या कारणावरून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच आज पहाटे प्राध्यापकाची राहत्या घरात हत्या झाल्याची घटना समोर आली आहे.

Published by: News18 Desk
First published: October 11, 2021, 11:24 AM IST

ताज्या बातम्या