मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मोबाइलनं घेतला जीव! गेम खेळण्यासाठी फोन दिला नाही म्हणून 12 वर्षीय चिमुरड्याची आत्महत्या

मोबाइलनं घेतला जीव! गेम खेळण्यासाठी फोन दिला नाही म्हणून 12 वर्षीय चिमुरड्याची आत्महत्या

Buldana Suicide: बुलडाणामधील एका घटनेने सर्वांच्या काळजात चर्रर झालं आहे. अवघ्या 12 वर्षांच्या मुलाने त्याला गेम खेळण्यासाठी मोबाइल मिळाला नाही म्हणून टोकाचं पाऊल उचललं आहे.

Buldana Suicide: बुलडाणामधील एका घटनेने सर्वांच्या काळजात चर्रर झालं आहे. अवघ्या 12 वर्षांच्या मुलाने त्याला गेम खेळण्यासाठी मोबाइल मिळाला नाही म्हणून टोकाचं पाऊल उचललं आहे.

Buldana Suicide: बुलडाणामधील एका घटनेने सर्वांच्या काळजात चर्रर झालं आहे. अवघ्या 12 वर्षांच्या मुलाने त्याला गेम खेळण्यासाठी मोबाइल मिळाला नाही म्हणून टोकाचं पाऊल उचललं आहे.

राहुल खंडारे, बुलडाणा, 04 एप्रिल: सध्या ऑनलाइन शिक्षणामुळे (Online Education) मोबाइल हा लहानग्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनला आहे. मात्र अभ्यासाबरोबरच या लहान मुलांकडून गेम खेळणे (Mobile Games) , व्हिडीओ पाहणे यांकरता देखील मोबाइलचा वापर वाढला आहे. मुलं मोबाइलच्या आहारी गेल्याचंही अनेकदा पाहायला मिळतं आहे. अशावेळी मोबाइल मिळाला नाही तर मुलं आरडाओरड करतात, रडतात किंवा रुसून बसतात. पण बुलडाणामधील एका घटनेने सर्वांच्या काळजात चर्रर झालं आहे. अवघ्या 12 वर्षांच्या मुलाने त्याला गेम खेळण्यासाठी मोबाइल मिळाला नाही म्हणून टोकाचं पाऊल उचललं आहे. विषारी औषध घेऊन या विद्यार्थ्यांने आत्महत्या (12 Year boy from Buldana committed Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे बुलडाण्यातील इंगळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्याच्या टाकळीपंच येथील शेतकरी दाम्पत्याने कोरोना काळात आपली मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी त्यांना अँड्रॉइड मोबाइल घेऊन दिला. दिवसभर शेतीची काम करून हा मोबाइल त्यांनी मुलांना शिक्षणासाठी घेऊन दिला होता. मात्र हाच मोबाइल त्यांच्या मुलासाठी काळ बनून येईल हे त्यांना उमगलं नाही.

(हे वाचा-नक्षलवाद्यांविरोधातील चकमकीनंतर 18 जवान अद्याप बेपत्ता; सकाळी पुन्हा सर्च ऑपरेशन)

शेतीच्या कामात व्यस्त असल्यामुळे दिलेल्या मोबाइलवर मुलं दिवसभर काय करतात याकडे त्यांचं लक्ष गेलं नाही. घरात दोघे भावंड अभ्यास सोडून मोबाइलवर ऑनलाइन गेम्स खेळत होते. एके दिवशी या भावंडांपैकी शैलेश या 12 वर्षीय मुलाला त्याच्या भावाने मोबाइल न दिल्याने त्याने रागाच्या भरात विष पिऊन आत्महत्या केली. इंगळे कुटुंबीय या घटनेमुळ पुरते हादरून गेले आहेत. परमेश्वर इंगळे आणि नीता इंगळे या आईवडीलांकडे आता शैलेशच्या आठवणींशिवाय काहीच उरलं नाही आहे.

परमेश्वर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी ते घरी आल्यानंतर त्यांच्या मुलांमध्ये किरकोळ वाद झाल्याचे त्यांना समजले. त्यातूनच शैलेशने विष घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.  शाळा चालू असती तर मोबाइलच आणावा लागला नसता, या मोबाइलमुळेच हे घडलं असल्याची दु:ख या आईबापाने व्यक्त केलं आहे.

(हे वाचा-पुण्यात कोरोनाच्या समुह संसर्गाला सुरुवात? एकाच दिवसात 10 हजाराहून अधिक रुग्ण)

दोन्ही मुलं दिवसभर मोबाईल पाहत होती, त्यांच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी कुणी नसल्याने आणि मुलं मोबाइलच्या आहारी गेल्यानेच हा प्रकार घडला असल्याचं इंगळे कुटुंबीय सांगतात. ऑनलाइन शिक्षणासाठी मुलांना मोबाईल द्यावा लागला नसता तर आमचा मुलगा आज जिवंत असता. अशी खंतही बोलून दाखवली

First published: