मराठी बातम्या /बातम्या /पुणे /गंभीर स्थिती! पुण्यात कोरोनाच्या समुह संसर्गाला सुरुवात? रुग्णसंख्या एकाच दिवसात तब्बल 10 हजाराच्या पार!

गंभीर स्थिती! पुण्यात कोरोनाच्या समुह संसर्गाला सुरुवात? रुग्णसंख्या एकाच दिवसात तब्बल 10 हजाराच्या पार!

Pune Coronavirus :  जिल्ह्यात पुन्हा एकदा परिस्थिती गंभीर झाली असून शनिवारी तर कोरोना रुग्णसंख्येने (Corona Patients) आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत.

Pune Coronavirus : जिल्ह्यात पुन्हा एकदा परिस्थिती गंभीर झाली असून शनिवारी तर कोरोना रुग्णसंख्येने (Corona Patients) आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत.

Pune Coronavirus : जिल्ह्यात पुन्हा एकदा परिस्थिती गंभीर झाली असून शनिवारी तर कोरोना रुग्णसंख्येने (Corona Patients) आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत.

पुणे, 4 एप्रिल : कोरोनाच्या पहिल्या लाटेत पुणे जिल्हा हॉटस्पॉट (Pune District Corona Hotspot) ठरला होता. त्यानंतर काही दिवसांनी चित्र बदललं आणि जिल्ह्यातील वाटचाल कोरोनामुक्तीकडे होऊ लागले. रुग्णसंख्या कमी झाल्याने अनेक कोव्हिड सेंटर्सही बंद करण्यात आली. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून पुन्हा एकदा परिस्थिती गंभीर झाली असून शनिवारी तर कोरोना रुग्णसंख्येने (Corona Patients) आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत.

पुणे जिल्ह्यात 3 एप्रिल रोजी तब्बल 10 हजाराहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी दिवसवभरात पुणे जिल्ह्यात तब्बल 10 हजार 827 नवे रूग्ण आढळून आले आहेत. तर फक्त पुणे शहरात 5 हजार 720 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली.

पिंपरी चिंचवडमध्ये 2832 तर ग्रामीण भागात पहिल्यांदाच दीड हजारांवर रूग्णसंख्या झाली आहे. शनिवारी 66 कोरोना रुग्णांनी आपले प्रमाण गमावले आहेत. त्यामुळे पुण्यात कोरोनाचा समुह संसर्ग तर झाला नाही ना? अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा - ...आणि पुणेकर '7 च्या आत घरात' पोहोचले, पुण्यातील संचारबंदीचे PHOTOS

दरम्यान, एकीकडे कोरोनाबाबत पुण्यातील स्थिती गंभीर होत असताना राजकीय नेते मात्र लॉकडाऊनवरून चिखलफेक करण्यात मग्न असल्याचं दिसत आहे. त्यामुळे पुण्यातली कोरोनाची संसर्ग साखळी तुटणार तरी कशी? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. पुण्यातील कोरोना रुग्णसंख्या दररोज नवा उच्चांक गाठत असताना बेड्सचीही मारामार दिवसागणिक वाढू लागली आहे.

शहरात मिनी लॉकडाऊनची काय आहे स्थिती?

पुण्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी संध्याकाळी सहा वाजल्यापासून कोरोना मिनी लॉकडाऊन अर्थात 12 तासांची संचारबंदी लागू झाली आहे. संचारबंदी लागू होताच पुणे पोलिसांनी प्रमुख चौकातून नाकेबंदी करण्यात येत आहे.

First published:

Tags: Coronavirus, Pune (City/Town/Village)