मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /साईंच्या दर्शनासाठी पत्नीचा हट्ट, पतीने सुट्टीही घेतली; मात्र, आयुष्याचा प्रवास ठरला शेवटचा

साईंच्या दर्शनासाठी पत्नीचा हट्ट, पतीने सुट्टीही घेतली; मात्र, आयुष्याचा प्रवास ठरला शेवटचा

अंबरनाथच्या मोरीवली येथील रहिवासी 15 बस करून काल रात्री शिर्डीला देवदर्शनासाठी निघाले होते.

अंबरनाथच्या मोरीवली येथील रहिवासी 15 बस करून काल रात्री शिर्डीला देवदर्शनासाठी निघाले होते.

अंबरनाथच्या मोरीवली येथील रहिवासी 15 बस करून काल रात्री शिर्डीला देवदर्शनासाठी निघाले होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Ambarnath, India

अंबरनाथ, 13 जानेवारी : काही दिवसांपूर्वीच शिर्डीला जाणाऱ्या एका दाम्पत्याचा अपघात घडला होता. या अपघातात दुर्दैवाने पती-पत्नीचा मृत्यू झाला होता. यानंतर आता एक आता एक धक्कादायक घटना घडली आहे. शिर्डीला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल 10 जणांचा मृत्यू झाला. तसेच यामध्ये मोरीवली गावातील दोन कुटुंबातील चार जणांचाही समावेश आहे. या भीषण अपघातामुळे अंबरनाथच्या मोरीवली गावात शोककळा पसरली आहे.

अंबरनाथच्या मोरीवली येथील रहिवासी 15 बस करून काल रात्री शिर्डीला देवदर्शनासाठी निघाले होते. यातील एका बसचा पहाटेच्या सुमारास नाशिकच्या घोटी सिन्नर महामार्गावरील पाथरे गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच यापैकी 8 जण हे अंबरनाथच्या मोरीवली या एकाच गावातील आहे. तसेच या अपघातात मोरीवली गावातील दोन कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मोरीवली गावावर शोककळा पसरली आहे.

मागील अनेक वर्षांपासून मोरीवली गावातील महालक्ष्मी पॅकेजिंग कंपनीचे मालक कर्मचारी आणि परिचयातील व्यक्तींना मोफत शिर्डीला देवदर्शनाला घेऊन जातात, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. मात्र, यावेळी भीषण अपघात झाल्याने मोरीवली गावातील उबाळे आणि बारस्कर कुटुंबांवर काळाने घाला घातला. त्यात शिर्डीला निघालेले दोन्ही कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला.

हेही वाचा - जळगावमधील विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गंभीर प्रकार; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल

दोन मुली झाल्या पोरक्या -

नरेश उबाळे एका वाईन शॉपमध्ये काम करत असल्याने त्याला सुट्टी मिळत नसे. पत्नी वैशालीला शिर्डीला देवदर्शनाला जाण्याचे पास मिळाले आणि तिने आपल्या पतीकडे म्हणजे नरेशकडे साईबाबांच्या दर्शनाला जाण्याचा हट्ट धरला. यामुळे कुटुंबाला वेळ देण्यासाठी नरेश यांनीदेखील कधी नव्हे ती सुट्टी घेतली आणि गुरुवारी रात्री बसमधून निघाले.

नरेश यांना 3 मोठे भाऊ आहेत. त्यांच्या घरातील एकूण 17 सदस्य देवदर्शनाला गेले होते. नरेश, पत्नी वैशाली, मुलगी निधी व मधुरा यांच्यासह शिर्डीला निघाले. पहाटे झालेल्या अपघातात नरेश उबाळे व वैशाली उबाळे यांचा मृत्यू झाला. तर 9 वर्षीय निधी ही गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. आई वडिलांच्या निधनाने निधी व मधुरा पोरक्या झाल्या आहेत.

बारस्कर कुटूंबातील दोघांचा मृत्यू

दरम्यान मोरीवली गावातील सुहास बारस्कर, पत्नी आणि दोन मुलीसुद्धा याच बसूनमधून शिर्डीला जात होत्या. त्यात अपघात झाल्याने बारस्कर यांच्या पत्नी श्रद्धा आणि त्याची चिमुरडी मुलगी श्रावणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सुहास बारस्कर आणि मोठी मुलगी शिवन्या हे बचावले आहेत.

First published:

Tags: Accident, Road accident, Saibaba, Shirdi