रवी सपाटे, प्रतिनिधी गोंदिया, 16 ऑक्टोबर : गोंदिया जिल्ह्यात पुन्हा धान घोटाळा समोर आला आहे. गोर्रे येथील संस्थेचा तब्बल 1 कोटी 75 लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलीस तक्रार होताच सर्व संस्थासंचालक फरार झाले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील धान खरेदीचे एका मागून एक घोटाळे पुढे येत असून आदिवासी महामंडळाने सालेकसा तालुक्यातील गोर्रे येथील आदिवासी धान खरेदी संस्थेच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार केल्याचे माहीत होताच संस्थेचे अध्यक्ष व इतर संचालक फरार झाले आहेत. त्यांचा शोध सालेकसा पोलिसांनी सुरू केला आहे. विभागाने केलेल्या चौकशीत ही माहिती पुढे आली आहे. ( हत्येसह 11 गंभीर गुन्हे पण थाटात केला भाजपात प्रवेश, मुनगंटीवारांनीच केलं वेलकम ) आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित गोर्रे येथील अध्यक्ष व इतर संचालक मंडळ व्यवस्थापक ग्रेडर यांनी संगनमताने महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक शासनाचे धानाचे अपहार केल्याचे विभागाने केलेल्या चौकशीत पुढे आले.
याप्रकरणी सहकारी संस्था गोर्रे येथील अध्यक्ष संतोष सदनलाल मडावी रा. मरकाखांदा व इतर संचालक शिवाजी कोसमे रा. सीतेपाला, अरुण मनमोनी फुंडे, सिंधीटोला, जयलाल पटले, गोरे, हिरामण जिंदाफोर, सीतेपाला, झाडू गावड-शिकारीटोला, खॊदूलाल टेकाम, शिकारीटोला रामजी सिरसाम, मानागड़, अनिल फुंडे सिंधीटोला, मुन्ना इंगळे, चेतन जुगनाखे, गजानन मरस्कोल्हे, उपप्रादेशिक व्यवस्थापक आशिष मुळेवार या सर्वांनी संगनमत करून सालेकसा तालुक्यामध्ये धान खरेदी करण्याकरिता आलेल्या नियुक्तीनंतर करारनाम्यातील नियमांचे उल्लघंन करून धानाचा अपहार केला. ( यंदाची दिवाळी पावसात? मुंबई, पुण्यातून मान्सून माघारीस होणार विलंब ) तसंच शासनाची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर महामंडळाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.