Home /News /love-story /

Ratan Tata यांनी लग्न का केलं नाही? कारण ऐकून डोळ्यांत येईल पाणी

Ratan Tata यांनी लग्न का केलं नाही? कारण ऐकून डोळ्यांत येईल पाणी

रतन टाटांनी लग्न का केलं नाही? कारण ऐकून डोळ्यात येईल पाणी

रतन टाटांनी लग्न का केलं नाही? कारण ऐकून डोळ्यात येईल पाणी

Why didn't Ratan Tata get married? : एवढी संपत्ती असूनही, एवढं यश मिळवूनही रतन टाटांनी लग्न का नाही केलं? हा प्रश्न अनेकांना पडतो. रतन टाटांनी एका मुलाखतीदरम्यान या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं.

    मुंबई, 6 जुलै: टाटा उद्योग समुहाचे अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) हे फक्त भारतातीलच नाही तर जागतिक उद्योगविश्वातील मोठं नाव आहे. आपल्या दिलदार स्वभावामुळं रतन टाटा भारतीयांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा कंन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टायटन, टाटा केमिकल्स, टाटा पॉवर, टाटा कम्युनिकेशन, वोल्टाज, ट्रेन्ट अशा एक से बढकर एक अनेक कंपन्या टाटा समूहातर्फे चालवल्या जातात. रतन टाटा प्रचंड मोठ्या संपत्तीचे मालक आहेत, मात्र ते आपल्याला उत्पन्नातील मोठा वाटा दान करतात. त्यांची देशभक्ती, साधेपणा, प्रामाणिकपणा, संयम तसेच ध्येय्यासक्तपणा इत्यादींमुळे रतन टाटा भारतातील इतर उद्योगपतींपेक्षा वेगळे ठरतात. म्हणूनच देशातील प्रत्येक घटक रतन टाटांबद्दल आदर बाळगून आहे. फक्त उद्योजकच नाही, तर एक माणूस म्हणूनही टाटा जनमाणसात लोकप्रिय आहेत. परंतु हे असलं तरी एक प्रश्न मात्र अनेकांना पडतो की एवढी संपत्ती असूनही, एवढं यश मिळवूनही रतन टाटांनी लग्न का नाही केलं? (Why didn't Ratan Tata get married?) रतन टाटांनी एका मुलाखतीदरम्यान स्वतः या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. रतन टाटा लॉस एंजेलिसमध्ये राहणाऱ्या एका अमेरिकन मुलीच्या प्रेमात (Ratan Tata Love Story) पडले होते. त्यांनी तिला प्रामाणिकपणे एक वचन दिलं होतं की, ते कधीही दुसऱ्या मुलीशी लग्न करणार नाहीत. एके दिवशी रतन टाटांना भारतातून फोन आला. त्यांची आजी आजारी असल्याचं त्यांना कळलं. त्यामुळे त्यांना तातडीने भारतात बोलावण्यात आलं. भारतात येण्यापूर्वी त्यांनी त्या मुलीला सोबत येण्यास सांगितले. परंतु 1962 मध्ये भारतात परिस्थिती साधारण नव्हती. कारण या काळात भारत-चीन युद्ध सुरु होतं. भारत-चीन युद्धामुळे मुलीच्या पालकांनी तिला भारतात पाठवण्यास नकार दिला. त्याचवेळी रतन टाटा यांनी भारतातून परत आल्यानंतर तिच्याशी लग्न करणार असल्याचं सांगितलं. हेही वाचा: तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपला ठेवा विठूरायाचे हे सुंदर स्टेटस; लाईक, शेअर्सचा पडेल पाऊस त्यानंतर रतन टाटा भारतात परत आले. त्यांच्या आजीचं निधन झालं. परंतु याचदरम्यान रतन टाटा यांना कळलं की, ते ज्या मुलीवर प्रेम करतात, (Ratan Tata Lover) जिच्याशी त्यांना लग्न करायचं होतं, त्या मुलीनं तिच्या आईवडिलांच्या मर्जीने दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केलं. हे ऐकून त्यांना धक्का बसला. परंतु त्याचवेळी त्यांनी ठरवलं की, आपण त्या मुलीला दिलेलं वचन आयुष्यभर पाळायचं आणि तेव्हाच त्यांनी निर्णय घेतला की आपण दुसऱ्या मुलीशी लग्न करायचं नाही. आणखी एक वस्तुस्थिती जी व्यापकपणे स्वीकारली जाते ती म्हणजे, त्यांना देशासाठी काम करण्याची आणि देशाच्या उन्नतीसाठी आपला संपूर्ण वेळ घालवायचा होता. त्यामुळं त्यांनी वैयक्तिक संबंध जोपासले नाहीत. हेही वाचा: वीज बिल निम्म्यावर आणू शकतात हे उपाय; AC वापरताना या गोष्टींवर ठेवा नजर रतन टाटांनी स्वत: एका मुलाखतीदरम्यान यावर भाष्य केलं होतं. यावेळी मुलाखतकाराने त्यांना विचारलं की, "मुलगी आयुष्यातून गेल्यावरही तुम्ही वचन का पाळले?" त्यावेळी ते म्हणाले, “माणूस गेल्यावरही घेतलेलं वचन पाळणं हेच त्या वचनाचे पावित्र्य आहे. प्रिय व्यक्ती गेल्यानंतरही तुम्ही त्यांना दिलेले वचन पाळले तर तुम्ही खरोखर प्रेम केले होते.”
    Published by:Suraj Sakunde
    First published:

    Tags: Love story, Marriage, Ratan tata, Tata group

    पुढील बातम्या