जाहिरात
मराठी बातम्या / लव स्टोरी / Love Story : अंध जोडीदाराशी लग्न करण्यासाठी केली मोठी प्रतीक्षा, लव्हस्टोरी पाहून वाटेल अभिमान! Video

Love Story : अंध जोडीदाराशी लग्न करण्यासाठी केली मोठी प्रतीक्षा, लव्हस्टोरी पाहून वाटेल अभिमान! Video

Love Story : अंध जोडीदाराशी लग्न करण्यासाठी केली मोठी प्रतीक्षा, लव्हस्टोरी पाहून वाटेल अभिमान! Video

Love Story : अंध प्रियकराशी लग्न करण्यासाठी पुण्यातील उच्चशिक्षित तरुणीला मोठी प्रतीक्षा करावी लागली. त्यांची लव्ह स्टोरी पाहून तुम्हाला त्यांचा अभिमान वाटेल.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

    नीलम कराळे, प्रतिनिधी पुणे, 14 फेब्रुवारी : प्रेमात पडलेल्या जोडप्यांची प्रेम विवाहाची वेगवेगळी उदाहरण तुम्ही आजूबाजूला पाहिले असतील. जात, धर्म, भाषा या सर्वांची बंधन प्रेमापुढं गळून पडतात. परस्परावरील प्रेम हे दोघांना एकत्र आणण्यासाठी मोठा दुवा असतं. पुण्यातील ही प्रेमाची गोष्टही हटके आहे. अगदी एखाद्याला चित्रपटाला शोभेल अशी ही सत्यकथा आहे. या प्रेम कथेतील नायक अंध आहे. पण, त्या प्रेमात पडलेली नायिकेनं आपल्या हिरोला घरातून परवानगी मिळावी म्हणून वाट पाहिली. तब्बल 15 वर्षांनी त्यांनी लग्न केलं. प्रेमाचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन डे च्या निमित्तानं ही ‘डोळस प्रेमकथा’ पाहूया कॉलेजमध्ये ओळख आणि… पुण्यातील राहुल देशमुख हे जन्मत: अंध आहेत. ते आणि त्यांची पत्नी देवता हे दोघं सर परशुरामभाऊ महाविद्यालयात एकत्र शिकत होते. कॉलेजमध्येच दोघांची ओळख आणि मैत्री झाली. या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. कॉलेजमध्येच त्यांनी अंध मुलांसाठी सामाजिक संस्था सुरू केली होती.

    News18

    राहुल आणि देवता हे तब्बल 15 वर्ष सामाजिक संस्थेच्या माध्यमातून एकत्र होते. दोघांचंही परस्परांवर प्रेम होतं. राहुल अंध असल्यानं त्यांच्या लग्नाला साहजिकच देवताच्या घरच्यांचा विरोध होता. पण, घरच्या संमतीनंच लग्न करेन हा देवताचा निश्चय होता. Love Story : जोडीदाराचे डोळे जाणार हे माहिती असूनही ‘त्यांनी’ केलं लग्न! Video सामाजिक भान जपणारं जोडपं देवता एमबीए झाल्या आहेत. त्या टाटा कंपनीमध्ये नोकरीही करत होत्या. काही काळानंतर त्यांनी नोकरी सोडून पूर्णपणे संस्थेचं काम करण्याचं ठरवलं. राहुल हे युनिव्हर्सिटी टॉपर आहेत. एका बँकेत नोकरी करतात. दोघांच्या प्रेमाला अखेर देवताच्या घरच्यांनी परवानगी दिली आणि त्यांचं लग्न झालं. आता त्यांना एक छान मुलगी देखील आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    ‘नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकल चॅलेंजेस’ या संस्थेचं राहुल आणि देवता काम करतात. त्यांनी आजपर्यंत हजारो अंध मुलांना सुशिक्षित करून स्वत:च्या पायावर उभं राहण्यास मदत केली आहे. त्यांच्या कार्याची विविध पातळीवर दखल घेण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी अभिनेता आमिर खान यांच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमातही ते सहभागी झाले होते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात