मराठी बातम्या /बातम्या /love-story /

प्रेमाला वय नाही; भर पावसातील पुण्याच्या 'या' ज्येष्ठ जोडप्याचा VIDEO पाहून सर्वच इमोशनल

प्रेमाला वय नाही; भर पावसातील पुण्याच्या 'या' ज्येष्ठ जोडप्याचा VIDEO पाहून सर्वच इमोशनल

प्रत्येक माणूस खऱ्या प्रेमाच्या शोधात असतो. प्रत्येकालाच त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी एक व्यक्ती हवी असते. एक अशी व्यक्ती जी सुख-दुःखात कधीच साथ सोडणार नाही. प्रत्येक भावना समजून घेणारी आणि मनातील प्रत्येक गोष्ट जिच्याशी मोकळेपणाने बोलता येईल, जी सुख-दुःखात साथ देईल, कोणत्याही अडचणीच्या रस्त्यावर सोबत चालेल, अशी व्यक्ती प्रत्येकाला हवी असते.

पुढे वाचा ...
    मुंबई, 22 जुलै-    प्रत्येक माणूस खऱ्या प्रेमाच्या शोधात असतो. प्रत्येकालाच त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी एक व्यक्ती हवी असते. एक अशी व्यक्ती जी सुख-दुःखात कधीच साथ सोडणार नाही. प्रत्येक भावना समजून घेणारी आणि मनातील प्रत्येक गोष्ट जिच्याशी मोकळेपणाने बोलता येईल, जी सुख-दुःखात साथ देईल, कोणत्याही अडचणीच्या रस्त्यावर सोबत चालेल, अशी व्यक्ती प्रत्येकाला हवी असते. हल्ली प्रेम असल्याचं म्हणत जोडपी लग्न करतात, पण आयुष्यभर एकमेकांची साथ देऊ शकत नाही. अनेक जण कोणत्या ना कोणत्या कारणाने घटस्फोट घेतात किंवा वेगळे राहतात. त्यामुळे एकमेकांसोबत प्रेमाने वेळ घालवणारी उतारवयातील जोडपी फार पाहायला मिळत नाहीत. त्यात एखादवेळी कुठे अशी जोडपी पाहिली की मग वाटतं, या दोघांनी असंच सुखाने एकमेकांसोबत आयुष्य घालवावं. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो व्हिडिओ पाहिल्यावर प्रेम अजून टिकून आहे, असंच तुम्हीही म्हणाल. इन्स्टाग्रामवर असिफ खान नावाच्या युजरने thetherelement नावाच्या अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. तो व्हिडिओ पाहिल्यावर नक्कीच तुमचं मन भरून येईल. यामध्ये एक वृद्ध जोडपं एकमेकांना सोबत घेऊन पावसात सावकाश चालत आहे. हातात छत्री घेऊन पत्नीला पावसापासून वाचवणाऱ्या या आजोबांनी खऱ्या प्रेमाची व्याख्याच जणू सांगितली. रिमझिम पावसात रस्त्यावर सोबत चाललेलं हे वृद्ध जोडपं लोकांना खूप आवडलं. आजींनी एका हातात साडी आणि दुसऱ्या हातात पिशवी धरली आहे. त्यामुळे आजोबांनी आजींना पावसापासून वाचवण्यासाठी हातात छत्री धरली आहे, असं या व्हिडिओत दिसत आहे. त्यांचा व्हिडिओ बघताबघता इंटरनेटवर व्हायरल झाला. फोटोग्राफर (Photographer) आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर आसिफ खानने या जोडप्याचा व्हिडिओ कॅप्चर करून इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. हा प्रेमळ व्हिडिओ तब्बल 26 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलाय. नेट करी मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ शेअरदेखील करत आहेत.
    (हे वाचा: केरळच्या विद्यार्थ्यांचं चक्क 'Sit On Lap' आंदोलन, काय आहे नेमकं प्रकरण? ) म्हाताऱ्या आजी-आजोबांचा हा व्हिडिओ पुण्यातील (Pune) असल्याचं कळतंय. पावसात एकमेकांची काळजी घेणाऱ्या या वृद्ध जोडप्याने आपल्या बाजूच्या अनेकांना हे नातं दृढ करण्यासाठी आणि ते टिकवून ठेवण्यासाठी प्रेरणा दिली आहे. आजकाल जिथे प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टी नातं तुटण्यासाठी आणि नंतर वेगळं होण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्याच लहान-मोठ्या गोष्टीत एकमेकांना मदत केली आणि एकमेकांची काळजी घेतली तर नातं अजून दृढ होऊ शकतं, हेच या आजी-आजोबांनी आपल्या निस्पृह प्रेमळ कृतीतून दाखवून दिलंय.
    First published:

    Tags: Cute couple, Love, Pune, Romantic day, Video viral, Viral

    पुढील बातम्या