मुंबई, 9 एप्रिल : गेल्या काही दिवसांपासून IAS अधिकारी टीना डाबी (Tina Dabi) चांगल्याच चर्चेत आहेत. टीना डाबी या मराठमोळे अधिकारी प्रदीप गावंडे (Pradeep Gawande) यांच्याशी लग्न करणार आहेत. त्यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली. 28 वर्षीय टीना डाबी यांचं हे दुसरं लग्न आहे. टीना दाबी आणि प्रदीप यांचे लग्न 20 एप्रिल रोजी होणार आहे. 22 एप्रिलला जयपूरमध्ये भव्य रिसेप्शन होणार आहे. लग्नाच्या काही दिवस आधी टीना आणि प्रदीपने एक मोठा निर्णय घेतला. दोघांच्या या निर्णयामुळे त्यांचे चाहतेही नाराज झाले आहेत.
टीनाने फोटो शेअर करून केला होता -
टीनाने फोटो शेअर करून खुलासा केला होता टीनानेच प्रदीपसोबतच्या नात्याबद्दल खुलासा केला होता. त्याने इंस्टाग्रामवर प्रदीपसोबतचा एक फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली. टीनाने नंतर तिची प्रेमकथाही उघड केली. दुसरीकडे प्रदीपने आता टीनासोबतचा एक क्लोज फोटो शेअर केला आहे. मात्र, प्रदीप यांनी कमेंट सेक्शन बंद केले आहे. ज्या अकाऊंटवरुन नात्याबाबत सांगितले तेच… टीनाने तिच्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांना दुसऱ्या लग्नाची माहिती दिली होती. नंतर टीनाने प्रदीपसोबतचे अनेक फोटोही शेअर केले. आता प्रदीप आणि टीना या दोघांनीही त्यांचे इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट केले आहे. ट्रोल करणाऱ्यांमुळे नाराज होऊन दोघांनी हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. हेही वाचा - ‘एखाद्या घरातली व्यक्ती जेव्हा अपघाताने जाते तेव्हा…’ अभिनेत्रीची वाहतूक पोलिसांबद्दलची पोस्ट चर्चेत प्रदीप यांच्याबद्दल टीना दाबी काय म्हणाल्या? ‘प्रत्येकाला आयुष्यात दुसरी संधी मिळते. एखादं नातं पुढे जाऊ शकत नसेल, तर ते ओझं मानून वाहून नेण्याऐवजी ते नातं सोडून पुढे गेलं पाहिजे. प्रदीप खूप छान व्यक्ती आहे. प्रदीप हे महाराष्ट्रातील लातूरचे आहेत. औरंगाबाद मेडिकल कॉलेजमधून (Aurangabad Medical college) पदवी घेतल्यानंतर त्यांनी अनेक मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून काम केलं आहे. पुढे प्रशासकीय अधिकारी झाल्यानंतर ते राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी म्हणून चांगले काम करत आहेत.’ दरम्यान, टीना आणि प्रदीप यांच्या वयात 13 वर्षांचं अंतर आहे. प्रदीप गावंडे यांनीच पुढाकार घेऊन प्रपोज केल्याचं टीना यांनी एका मुलाखतीत सांगितलं. टीना प्रदीप यांना डॉक्टर साहब म्हणून हाक मारतात. टीना आणि अतहर खान यांचा घटस्फोट होण्याआधीच प्रदीप गावंडे आणि टीना यांच्यात जवळीक वाढल्याचं म्हटलं जातं. टीना आणि अतहर यांचा ऑगस्ट 2021मध्ये घटस्फोट झाला तर, टीना आणि प्रदीप यांच्यात मे 2021 मध्ये जवळीक वाढली, अशी चर्चा आहे.