मुंबई, 9 एप्रिल- स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या दमदार अभिनयाने विशेष छाप सोडली आहे. म्हणूनच सोशल मीडियावरही या कलाकारांचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसते. मालिका सततच्या ट्वीस्टमुळे सोशल मीडियावर देखील चर्चेत असते. या मालिकेतील एका अभिनेत्रीची वाहतूक पोलिसांबद्दलची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. या अभिनेत्रीचं नाव पूनम चांदोरकर **(Poonam Chandorkar)**असं आहे. सध्या ती आई कुठे काय करते मालिकेत विशाखाची भूमिका साकारताना दिसते. पूनम सोशल मीडियावर देखील नेहमी सक्रीय असते. तिनं नुकतीच एक वाहतूक पोलिसांबद्दल पोस्ट लिहिली आहे. सध्या तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. वाचा- घायाळ करणाऱ्या अंदाजात प्राजक्ता कोणाला म्हणतेय, ‘जाऊ दे, घ्या खपवून’ पूनम चांदोरकरनं इन्स्टा पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक ‘किंवा ‘अति घाई संकटात नेई ’ हे स्लोगन आपण वाचतो आणि सोडून देतो पण एखाद्या घरातली व्यक्ती जेव्हा अपघाताने जाते ना तेव्हा मात्र या प्रत्येक शब्दांचा आणि वाक्याचा अर्थ आयुष्यभर लक्षात राहतो…. आणि म्हणूनच हे गांभीर्य लक्षात घेऊन आज विषय- “रस्ते सुरक्षा लोकसहभाग आणि उपाययोजना” वाचा- धनश्री काडगावकरनं असा साजरा केला लेकासोबत बर्थडे, मिळालं खास सरप्राईज यावर सह्याद्री वाहिनीवर “हॅलो सह्याद्री “कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यात आली आणि उत्तम मार्गदर्शन लाभलं..श्री बाळासाहेब पाटील - पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा ठाणे शहर..ज्यांनी लोकसहभागातून ठाणे शहरात अनेक योजना राबवल्या आणि ते यशस्वी करून दाखवल्या.. आजचा कार्यक्रम नक्की बघा ..आज रात्री 11.00 pm आणि पुन्हा सोमवारी (11th April 22) सकाळी नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर..🙏. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
काही दिवसापूर्वी देखील पूनम अशाच एका पोस्टमुळे चर्चेत आली होती. त्यावेळी तिनं दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीसोबत (Vijay Sethupathi) काम करण्याची संधी मिळाल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती.