मराठी बातम्या /बातम्या /love-story /GirlFriend BoyFriend : सायकलने प्रियकराला भेटण्यासाठी युपीतून निघाली गुजरातला पण एक चूक पडली महागात

GirlFriend BoyFriend : सायकलने प्रियकराला भेटण्यासाठी युपीतून निघाली गुजरातला पण एक चूक पडली महागात

प्रेयसीने प्रियकराला भेटण्याची इच्छा व्यक्त केली मात्र प्रियकराने कामाचे कारण देत येण्यास असमर्थता दर्शवली.

प्रेयसीने प्रियकराला भेटण्याची इच्छा व्यक्त केली मात्र प्रियकराने कामाचे कारण देत येण्यास असमर्थता दर्शवली.

प्रेयसीने प्रियकराला भेटण्याची इच्छा व्यक्त केली मात्र प्रियकराने कामाचे कारण देत येण्यास असमर्थता दर्शवली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India

मुंबई, 19 जानेवारी : सोशल मीडियाच्या जमान्यात कोणी कोणाच्या प्रेमात कधी पडेल हे सांगता येत नाही. सध्या अशा अनेक घटना आपण ऐकत आहोत. इंस्टाग्राम, फेसबुक वापरताना चॅटींग करतेवेळी सोशल मीडियात कोण कोणाचे कधी मित्र बनतील याचा काही अंदाज नाही. मग या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात कधी होतं हे ही समजत नाही. दरम्यान यातूत शेकडो मैल एकमेकांचे मित्र झालेल्या घटना आपण पाहिल्या आहेत. असाच एक प्रकार यूपीतील बलिया या गावातून समोर आला आहे. सोशल मीडियावर चॅटिंग करताना एक तरुणी एका तरुणाच्या प्रेमात पडली.

मुलगी युपीतील बलिया आणि मुलगा गुजरातमध्ये राहतो त्यांची सोशल मीडियातून मैत्री झाली. प्रेयसीने प्रियकराला भेटण्याची इच्छा व्यक्त केली मात्र प्रियकराने कामाचे कारण देत येण्यास असमर्थता दर्शवली. यानंतर प्रेयसी प्रियकराला भेटण्यासाठी चक्क निघाली तेही सायकलवरून ती निघाल्याची माहिती समोर आली आहे. 

हे ही वाचा : कॉलेज संपवून घरी जात होत्या दोघी, तेव्हाच वाटेत....एकीची प्रकृती गंभीर; राजापूर हादरलं!

तिने आपली सायकल आणि काही कपडे पिशवीत घेऊन गुजरातच्या दिशेने निघाली. मात्र प्रेयसीच्या चुकीमुळे पोलिसांनी तिला पकडून तीच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले आहे. यातून गुजरात आणि उत्तर प्रदेशमधील घटनेचा किस्सा समोर आला आहे. तिच्या एका चुकीने पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली यावेळी तिने घडलेली कथा सांगितली.

मणियार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील एक तरुणी गुजरातमधील सुरत येथे राहणाऱ्या तरुणाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आली. ते बोलत बोलत कधी प्रेमात पडले त्यांनाच समजले नाही. दरम्यान प्रेयसीला प्रियकराला भेटण्याची इच्छा होती परंतु प्रियकराची इच्छा नव्हती. प्रेयसी वारंवार फोन करत राहिली, मात्र तो येथे यायला तयार नव्हता. 

हे ही वाचा : स्वाती मालीवालला कारने 15 मीटरपर्यंत फरफटत नेलं; दिल्ली महिला आयोग अध्यक्षासोबत धक्कादायक प्रकार

दरम्यान, मंगळवारी ही तरुणी प्रियकराला भेटण्यासाठी बॅगेत कपडे, मोबाईल आणि चार्जर घेऊन सायकलवरून घरातून निघाली. परिसरातील शंकरपूर बाजारपेठेत मोबाईल चार्ज केल्याने ती चिंतेत होती. दरम्यान, काही दुकानदारांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. अन् पोलिसांनी चौकशी केल्यावर हे प्रकरण समोर आले आहे.

First published:

Tags: Boyfriend, Girlfriend, Gujrat, Uttar pradesh