मुंबई, 10 मार्च : महिलांची भांडणं (Women Fight Video) तशी काही नवी नाहीत. सोसायटीतील सार्वजनिक नळ असो, बाजार असो किंवा अगदी लोकल ट्रेन अशी कोणतीच जागा नाही जिथं महिलांची भांडणं (Women Fighting) तुम्ही पाहिली नसतील. पण सध्या एका मॉलमधील महिलांच्या फायटिंगचा (Women Fighting in the mall) व्हिडीओ व्हायरल (viral video) होतो आहे. साधीसुधी नाही बरं का अगदी तुम्ही प्रत्यक्षात WWF च पाहत आहात की काय? अशीच ही फायटिंग रंगली. एका ट्विटर युझरनं मॉलमध्ये महिलांमध्ये झालेल्या या फायटिंगचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये चक्क मॉलमध्येच महिलांची फ्री स्टाईल हाणामारी झालेली पाहायला मिळते. कदाचित अशी फायटिंग तुम्ही याआधी प्रत्यक्षात कधीच पाहिली नसेल.
व्हिडीओत पाहू शकता महिला एकमेकींच्या झिंझ्या उपटतात. त्यावरच त्या थांबत नाहीत तर एकमेकींना जमिनीवरही आपटतात. मॉलमधील कर्मचारी मध्यस्थीसाठी येतात आणि या महिलांना एकमेकींपासून वेगळं करतात. नाहीतर या महिलांनी काय केलं असतं याची कल्पनाच आपण न केलेली बरी. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला एकतर नळावरची भांडणं आठवली असतील. नाहीतर टीव्हीवर पाहत असलेली WWF. हे वाचा - घराच्या बागेतच सापांमध्ये जुंपलं तुंबळ युद्ध, VIDEO पाहून अंगावर येतील शहारे हा व्हिडीओ अमेरिकेतल्या एरिझानोच्या स्कॉट्सडेलमधील असल्याचं सांगितलं जातं आहे. 6 मार्चला घडलेली ही घटना. फॅशन स्क्वायर मॉलमध्ये लाइन तोडल्यानं काही कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये जुंपली. ही घटना कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली. जी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते आहे. रिपोर्टनुसार या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.