मुंबई, 9 मार्च : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं (International Women's day) औचित्य साधून विविध जाहिरात कंपन्या आणि ब्रँड्सनी आधुनिक काळातील स्त्री आणि स्त्री-पुरुष समानतेच्या अनुषंगानं विविध जाहिराती बनवल्या, सोशल मीडियावर संदेश लिहिले. चूल आणि मूल यापेक्षा अधिक असलेली स्त्रीची जागा यानिमित्ताने गौरवली गेली. मात्र याच दिवशी एका बड्या अमेरिकन ब्रँडने मात्र 'स्त्रीची खरी जागा स्वयंपाकघरात' या अर्थाचं वाक्य लिहिलं. (Burger King Sexist Tweet) बर्गर किंगच्या या सेक्सिस्ट ट्वीटचा नेटकऱ्यांनी खरपूस समाचार घेतल. शेवटी बर्गर किंगला सपशेल माफी मागत ट्वीट मागे घ्यावं लागलं.
महिलेला पारंपरिक रूपात सादर करणारा संदेश हे या टीकेचं कारण होतं. हे ट्विट होतं बर्गर किंगचं. बर्गच किंग चे स्पर्धक असणाऱ्या केएफसीसोबत (KFC) इतरही अनेक फूड चेन्सनी या ट्वीटसाठी बर्गर किंगला चांगलेच खडे बोल सुनावले. असं काय होतं तरी काय या ट्विटमध्ये? (women's day news) आणि बर्गर किंगला ते महिला दिनालाच करायची बुद्धी कुठून झाली?
हेही वाचा मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी लावा या 6 हेल्दी सवयी; तणावापासून राहा दूर
महिला दिनानिमित्त बर्गर किंगनं आपल्या पाककलेबाबतच्या शिष्यवृत्तीला प्रोत्साहन देण्यासह त्यात महिलांची भागीदारी वाढवण्यास एक tweet केलं होतं. त्यात लिहिलं होतं, 'women belong in the kitchen' (burger king tweet on women's day)
बर्गर किंगच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर लोक खूप रागात आले. त्यांनी कंपनीविरुद्ध लिहिणं सुरू केलं. लोकांनी कंपनीच्या मानसिकतेला स्त्रीविरोधी संबोधलं. मग बर्गर किंगचा प्रतिस्पर्धी असलेला केएफसी तरी का मागं राहील? त्यानंही आपल्या शैलीत बर्गर किंगवर टीका केली. (burger king controversial tweet)
सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी चांगलाच समाचार घेतल्यावर बर्गर किंगचे डोळे उघडले. त्यांनी स्पष्टपणे माफी मागत आपलं जुनं ट्विट डिलीट केलं. आता या ट्विटमध्ये बर्गर किंगनं लिहिलं आहे, की आम्ही तुमचा आवाज ऐकला. आपलं जुनं ट्विट काढून टाकण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. (burger king apology after women tweet)
आम्ही मान्य करतो, की आमची चूक झाली. आमच्या ब्रिटनमधील किचनमध्ये केवळ 20 टक्के महिला आहेत. महिलांचं लक्ष या बाबीकडे वेधलं जावं अशी आमची इच्छा होती. तिथलं लिंग गुणोत्तर आम्हाला सुधारायचं आहे.
We hear you. We got our initial tweet wrong and we’re sorry. Our aim was to draw attention to the fact that only 20% of professional chefs in UK kitchens are women and to help change that by awarding culinary scholarships. We will do better next time.
— Burger King (@BurgerKingUK) March 8, 2021
आपलं स्पष्टीकरण देताना बर्गर किंगनं सांगितलं, की अमेरिकेसारख्या देशात केवळ 24 टक्के महिलाच हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करतात. आणि हेड शेफच्या पदाबाबत तर हे प्रमाण केवळ 7 टक्केच आहे. कंपनीनं न्यूयॉर्क टाइम्सच्या प्रिंट एडिशनमध्ये आपल्या स्वयंपाकाच्या स्कॉलरशिपबद्दल एक जाहिरात छापली आहे. यात त्यांनी प्रोफेशनल किचनची चर्चा केली आहे. यात महिलांचा सहभाग वाढावा अशी चर्चा केलेली आहे.
हेही वाचा वडिलांच्या आजारपणात उभा केला आयुर्वेदिक उत्पादन निर्मिती व्यवसाय; 'तिची कथा''
बर्गर किंगनं माफी मागितल्यावर आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिलं आहे, की माफी मागितल्यावर आम्ही आमचं जुनं ट्विट हटवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला जाणवलं, की आमच्या ट्विटनंतर लोक चुकीची भाषा वापरत आहेत. अशा भाषेला आम्हाला कसलाच वाव द्यायचा नाही.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Burger king, International women's day, Tweet, Womens day