मुंबई, 05 एप्रिल : उन्हाळा (Summer) आता शिगेला पोहोचला असून बाजारात आंबे (Mango) येण्यास सुरुवात झाली आहे. आंबा फक्त चवीलाच नाही तर आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. WebMD च्या माहितीनुसार, आंब्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक घटक असतात. रक्त गोठणे, अॅनिमियाच्या समस्यांवर आंबा प्रभावी ठरतो. एवढेच नाही तर आपल्या शरीरातील हाडे मजबूत होण्यासही मदत होते. आंब्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी रक्तवाहिन्या आणि कोलेजनसाठीही फायदेशीर आहे. ज्यामुळे शरीरातील विविध समस्या लवकरात लवकर बऱ्या करणे सोपे होते. जाणून घेऊया उन्हाळ्यात आंबा खाल्ल्याने आणखी कोणते (Mango health benefit) फायदे होतात. उन्हाळ्यात आंबा खाण्याचे फायदे हृदयाच्या समस्या आंबे खाल्ल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली चांगले काम करते. यामध्ये असलेले मॅग्नेशियम आणि पोटॅशियम रक्तदाब सुधारते आणि पल्स रेट सामान्य ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे हृदयाच्या समस्या कमी होतात. चांगली पचनक्रिया आंब्यामध्ये भरपूर डायटरी फाइबर आढळते, त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि आतडी स्वच्छ करण्यास मदत होते. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर राहते आणि पचनक्रियाही चांगली राहते. मधुमेह आंबा हे कमी GI स्कोअर असलेले फळ आहे, ज्यामुळे तो मधुमेहींसाठी हानिकारक मानला जात नाही. याचा रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होत नाही आणि शरीराला ऊर्जा मिळते. वजन कमी करण्यास आंबा वजन कमी करण्यासाठी देखील अनुकूल मानला जातो, कारण आंबा खाल्ल्याने चरबी वाढत नाही आणि ते कोलेस्ट्रॉल मुक्त आहे. आंब्यात विरघळणारे फायबर भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे आपले पोट जास्त काळ भरलेले राहते, त्यामुळे आपण कमी खातो. हे वाचा - गोड, रसाळ असलं तरी उन्हाळ्यात हे फळ भरपूर खा; वजन राहील नियंत्रणात थायरॉईड आंब्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सीसारखे पोषक घटक असतात. जे रक्तदाब सुधारण्यास मदत करतात. आंब्यामध्ये असलेले मॅग्नेशियम थायरॉईडशी संबंधित समस्यांमध्ये देखील फायदेशीर आहे. हे वाचा - आता झोप पूर्ण होण्याचं टेन्शन विसरा; 4 तासांत घ्या 8 तासांची झोप; कशी ते वाचा त्वचेच्या समस्या आंब्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ए त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये अँटी-एक्ने आणि अँटी-एजिंग गुणधर्म भरपूर आहेत. व्हिटॅमिन सी कोलेजन वाढीस मदत आणि यामुळे त्वचा तसेच केस निरोगी राहतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.