मुंबई, 04 एप्रिल: सध्याच्या धावपळीच्या काळात सर्वांनाच शांत झोपेची नितांत गरज असते; मात्र प्रत्येकवेळी सगळ्यांनाच शांत झोप मिळते असं नाही. तसंच मोबाइलच्या वाढत्या वापरामुळे झोपेच्या वेळीदेखील माणसाचं मन स्थिर नसतं. त्यामुळे पुरेशा झोपेअभावी अनेक जणांना वेगवेगळ्या प्रकारच्या त्रासाचा सामना करावा लागतो. थकवा, अस्वस्थता, एकाग्र न होता येणं किंवा वेगवेगळ्या आजारांचाही यामुळे धोका संभवतो. यावर उपाय म्हणून गुगलचे सीईओ (Google CEO) सुंदर पिचाई हे वेगळे तंत्र अवलंबतात. NSDR म्हणजेच नॉन स्लीप डीप रेस्ट (Non Sleep Deep Rest) या तंत्राद्वारे 4 तासांत 8 तासांची झोप पूर्ण करणं शक्य आहे. यामुळे कमी वेळात पूर्णपणे आरामदायक झोप मिळते. जाणून घेऊ या या नॉन स्लीप डीप रेस्ट ट्रिकबद्दल. याबद्दलची सविस्तर माहिती देणारं वृत्त 'झी न्यूज हिंदी'ने प्रसिद्ध केलं आहे.
Benefits Of Cashews: काजू म्हणजे उर्जेचा पावरहाऊस, आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे
आपल्या मेंदूमधून अनेक प्रकारच्या न्यूरॉन लहरी बाहेर पडतात आणि यातून बाहेर पडणाऱ्या अल्फा लहरी मेंदूला आनंदी राहण्याचे संकेत देत असतात. योग आणि ध्यानाद्वारे या अल्फा लहरी सक्रिय करण्याचा प्रयत्न केला जातो. या लहरी सक्रिय झाल्यामुळे सर्व प्रकारचा ताण संपतो आणि मेंदू रिलॅक्सिंग मोडमध्ये जातो.
सगळं कुटुंब राहील निरोगी, घरातच तयार होणारी ही एक गोष्ट रोजच्या आहारात घ्या
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Sleep benefits, Tips