Home /News /lifestyle /

रोज एक केळ खाणं आहे खूपच उपयुक्त; महिलांना होऊ शकतात हे लाभ

रोज एक केळ खाणं आहे खूपच उपयुक्त; महिलांना होऊ शकतात हे लाभ

केळी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्याचे शरीराला अधिक फायदे होतात.

 मुंबई, 15 सप्टेंबर-   केळं (Banana) हे अनेकांना आवडणारं फळ असून, त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते बाराही महिने बाजारात उपलब्ध असतं. ते शक्तिवर्धक फळ आहे आणि ते खाल्ल्यामुळे शरीराला अनेक फायदेही होतात. दररोज एक केळं आहारात असेल, तर शरीराला अनेक फायदे होतात. अनेक आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो. दररोज एक केळं खाणं महिलांच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर (Banana for women's) ठरतं. झी न्यूजच्या वृत्तानुसार, भूक शमविण्यासाठी केळं खाणं फायदेशीर ठरतं. केळी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्याचे शरीराला अधिक फायदे होतात. ज्या महिला तणाव आणि शारीरिक कमजोरीने ग्रस्त आहेत, त्यांनी केळ्यांचं सेवन नक्कीच केलं पाहिजे. आहारतज्ज्ञ म्हणतात, की केळ्यांचं नियमित सेवन केल्याने हाडं मजबूत होतात. तसंच रोगप्रतिकारशक्ती वाढते. (हे वाचा:बाळासोबतच राहून फॅटची फिट झाली; प्रेग्नन्सीनंतर 4 महिन्यांतच घटवलं 13 किलो वजन) 'केळी हा पोषक तत्त्वांचा खजिना (Banana is a treasure trove of nutrients) आहे. यामध्ये थायमिन, रिबोफ्लेविन, नियासिन, फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन ए, बी, बी 6, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम यांसारखे घटक असतात. निरोगी शरीरासाठी हे सर्व घटक अत्यंत महत्त्वाचे मानले जातात,' असं डॉ. रंजना सिंह यांनी सांगितलं. केळी खाण्याचे फायदे (benefits of eating banana) - केळ्यांच्या सेवनामुळे नैराश्याच्या समस्येतून आराम मिळतो, हे अनेक संशोधनांतून स्पष्ट झालं आहे. केळ्यांमध्ये अशी काही प्रथिनं आढळतात, की ज्यामुळे नैराश्याच्या समस्येने ग्रासलेल्या रुग्णाला आराम वाटतो. याशिवाय केळ्यात आढळणारं व्हिटॅमिन बी 6 शरीरातल्या रक्तातल्या ग्लुकोजची पातळी योग्य प्रमाणात राखते. (हे वाचा:Bad Habits For Health: तुम्हाला 'या' वाईट सवयी असतील आरोग्याला आहे मोठा धोका) डॉ. रंजना सिंह यांच्या मते, केळं हे एक पूर्णान्न आहे. ते झटपट ऊर्जा देणारा पदार्थ म्हणून काम करतं. यामध्ये ग्लुकोजची उच्च पातळी असते. चती ऊर्जेचा एक महत्त्वाचा स्रोत असते. त्यामुळे महिलांनी रोज सकाळी एक केळं खाल्लं, तर त्यांना दिवसभर ऊर्जा मिळते आणि आवश्यक पोषक तत्त्वंदेखील मिळतात. ती त्यांच्या शरीराच्या गरजा पूर्ण करतात. - महिलांना बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून केळ्यांमुळे सुटका होते. दररोज रात्री झोपताना इसबगोल भुसी किंवा दुधासह केळी खावी. त्यामुळे पोटातल्या गॅसच्या, तसंच बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. - गर्भवती महिलांनी दररोज एक केळं खाणं आवश्यक आहे. त्यात फॉलिक अॅसिड असतं. ते नवीन पेशी बनवण्यासाठी आणि बाळातले जन्मदोष दूर करण्यासाठी आवश्यक मानलं जातं. गर्भाच्या चांगल्या वाढीसाठीही केळं खाणं आवश्यक आहे, असं डॉ. रंजना सिंह सांगतात.
First published:

Tags: Health Tips, Lifestyle

पुढील बातम्या