मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

जीममध्ये न जाता फक्त बाळासोबतच राहून फॅटची फिट झाली; प्रेग्नन्सीनंतर 4 महिन्यांतच घटवलं 13 किलो वजन

जीममध्ये न जाता फक्त बाळासोबतच राहून फॅटची फिट झाली; प्रेग्नन्सीनंतर 4 महिन्यांतच घटवलं 13 किलो वजन

वॉशिंग्टन, 15 सप्टेंबर : प्रत्येक महिलेसाठी गर्भधारणा (Pregnancy) ते प्रसूती (Delivery) हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा असतो. या कालावधीत आणि यानंतर महिलांमध्ये शारीरिक, मानसिक बदल होत असतात. महिलांमध्ये प्रसूतीनंतर वाढलेलं वजन (Weight Gain) हा ठळकपणे दिसणारा बाह्य स्वरूपाचा बदल म्हणता येईल. अनेक महिला गर्भधारणेच्या, तसेच डिलिव्हरीनंतरच्या कालावधीत वाढतं वजन (Post pregnancy Weight Gain) आटोक्यात ठेवण्यात अपयशी ठरतात. वाढत्या वजनामुळे त्यांना अनेक समस्यांनाही सामोरं जावं लागतं. परंतु, या गोष्टीला अमेरिकेतल्या (America) फ्लोरिडातली निकी जौम्पोली (Niki Zoumpouli) ही महिला अपवाद ठरली. बाळाच्या जन्मानंतर निकीनं परिश्रम घेऊन आपलं वजन आटोक्यात आणलं आणि ती पहिल्यासारखीच सुडौल आणि ग्लॅमरस (Glamourous) दिसू लागली.

प्रसूतिपश्चात वाढलेलं वजन हा आज अनेक महिलांसमोरचा यक्षप्रश्न आहे. बाळाच्या जन्मानंतर वाढलेलं वजन आटोक्यात आणून पुन्हा सुडौल कसं व्हावं, असा प्रश्न महिला नेहमीच विचारताना दिसतात. अशाच महिलांना फिटनेस ट्रेनर असलेली आणि प्रेग्नन्सीनंतर स्वतः वजन घटवणारी निकी मार्गदर्शन करते.

'द सन'च्या वृत्तानुसार,  मे 2019 मध्ये निकीने एका मुलीला जन्म दिला. यादरम्यान तिचं 13 किलो वजन वाढलं होतं. आपण पुन्हा सुडौल दिसलं पाहिजे, असा विचार तिच्या मनात आला आणि तिनं पुन्हा वर्क आउट (Work out) सुरू केलं. मुलीच्या जन्माच्या 6 आठवड्यांनंतर तिनं व्यायामाला सुरुवात केली. यासाठी तिनं घरातल्या गॅरेजचं रूपांतर जिममध्ये केलं आणि अवघ्या चार महिन्यांत ती पुन्हा सुडौल झाली.  अथक परिश्रमांनंतर तिनं तिचा उद्देश साध्य केला.

हे वाचा - 10 महिन्यांतच दोनदा प्रेग्नंट, 3 बाळांना जन्म; प्रेग्नन्सीमुळे डॉक्टरही चक्रावले

आई बनण्यापूर्वीचा आणि आई झाल्यानंतरचा एक फोटो निकीनं नुकताच शेअर केला. त्यात ती अधिकच सुंदर आणि सुडौल दिसत होती. 'आई होण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो, याची जाणीव मला आहे. परंतु, याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या शरीराकडे दुर्लक्ष करावं. माझी मुलगी अरिया हिच्या जन्मानंतर मी खूप अशक्त झाल्याचं मला जाणवलं. पण मी मागं वळून पाहिलं नाही. व्यायाम सुरू केला आणि आता मी एकदम फिट आहे', असं निकीनं सांगितलं.

आपल्या अनुभवाचा फायदा अन्य महिलांनाही व्हावा या उद्देशानं निकीनं मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. सध्या निकी फिटनेस ट्रेनर (Fitness Trainer) म्हणून कार्यरत आहे. निकीने 2018मध्ये एक फिटनेस अॅप (Fitness App) सुरू केलं. या अॅपचे सध्या एक लाखाहून अधिक युझर्स आहेत. यात नुकत्याच आई झालेल्या महिलांची संख्या अधिक आहे. शरीरात जमा झालेले फॅट्स कमी करून स्नायू मजबूत करण्यासाठीचं प्रशिक्षण निकी या महिलांना देते.

हे वाचा - अवघ्या 1 सेकंदात रडणाऱ्या बाळाला करा शांत; ही ट्रिक कधीच होत नाही फेल

'प्रत्येक आईनं व्यायाम करताना आपल्या मुलांनाही त्यात सहभागी करून घ्यावं. यामुळे तुमच्या मुलांनाही प्रेरणा मिळेल आणि तीदेखील व्यायाम करू लागतील', असं निकी आवर्जून नमूद करते. निकीचे हे प्रयत्न आणि सुडौल शरीरासाठी घेतलेले परिश्रम अन्य महिलांनाही निश्चितच प्रेरणादायी ठरणारे आहेत.

First published:

Tags: Lifestyle, Pregnancy, Pregnant woman, Weight loss, Weight loss tips