Home /News /lifestyle /

घरी कुंडीत सुद्धा लावू शकता रुद्राक्षाचं रोप; भारतातच नव्हे तर परदेशातही आहे मोठी मागणी

घरी कुंडीत सुद्धा लावू शकता रुद्राक्षाचं रोप; भारतातच नव्हे तर परदेशातही आहे मोठी मागणी

अनेकांचा समज असा असतो की, रुद्राक्षाचं झाड दाट वनातच येतं. पण तसं नाही रुद्राक्षाचं रोप तुम्ही घरीही कुंडीत लावू शकता

    मुंबई, 16 जुलै : रुद्राक्षाला हिंदू धर्मात एक वेगळंच महत्त्व आहे. भारतामध्ये गेल्या काही वर्षांत रुद्राक्षांना खूप मागणी वाढली आहे. पूर्वी लोक धार्मिक श्रद्धेमुळे रुद्राक्ष धारण करीत असत पण आजकाल फॅशन (Fashion) आणि ट्रेंडी (Trendy) स्टाईलसाठी सुद्धा रुद्राक्ष वापरतात. रुद्राक्षांना केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही मोठी मागणी आहे. मात्र रुद्राक्ष वनस्पती फार दुर्मिळ आहे. पण धार्मिक ठिकाणी, तीर्थक्षेत्रांत, कुंभमेळ्यांतील (Kumbha Mela) साधुंच्या गळ्यात रुद्राक्ष दिसतो. त्यामुळे तो जवळचा वाटतो. अनेकांचा समज असा असतो की, रुद्राक्षाचं झाड दाट वनातच येतं. पण तसं नाही रुद्राक्षाचं रोप तुम्ही घरीही कुंडीत लावू शकता. गोरखपूरमध्ये राहणाऱ्या अनुराभ मणी त्रिपाठी यांनी त्यांच्या नर्सरीत रुद्राक्षाची रोपं लावली आहेत. जाणून घेऊया या उपक्रमाबद्दल. हे वृत्त ‘द बेटर इंडिया’ने दिलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून नर्सरी (Nursery) व्यवसाय करणाऱ्या गोरखपूरच्या अनुराभ मणि त्रिपाठी यांनी आपल्या घरात एका भांड्यामध्ये हिरव्या भाज्या व रुद्राक्षांची रोपं लावली आहेत. बर्‍याच लोकांचा असा समज असतो की रुद्राक्षांची रोपं भांड्यामध्ये लावता येत नाहीत. मात्र असं अजिबात नाही. काय सांगता! आता घामानेच चार्ज होणार मोबाईल फोन; चार्जर, पॉवर बँकची गरजच नाही अनुराभने म्हणाले, ‘ सर्वप्रथम आपल्याला खरा आणि योग्य रुद्राक्ष ओळखता यायला हवा. कारण बऱ्याच ठिकाणी ऑर्नामेंटल (Ornamental Rudraksha) रुद्राक्ष पाहायला मिळतात. ऑर्नामेंटल म्हणजे दागिन्यांमध्ये वापरण्यासाठीचे रुद्राक्ष ते बरेचदा हलक्या प्रतीचे असतात. रुद्राक्षाला बाजारात मोठी किंमत असल्याने बरेच लोक त्यामध्ये फसवणूक करतात. म्हणूनच नेहमी विश्वासू व्यक्ती किंवा नर्सरीमधून रुद्राक्षाची रोपे खरेदी करावी. खरे रुद्राक्ष ओळखण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. रुद्राक्षाची पानं आंब्याच्या (Mango leaves) पानांप्रमाणे दिसतात. पण रुद्राक्षाची पानं मऊ असतात. रुद्राक्षाचं झाड खूप मोठं झाल्यावर त्याची पानं गळून पडतात. ज्या ठिकाणाहून पाने गळून पडली त्या ठिकाणी डोळ्यासारखी रचना तयार होण्यास सुरुवात होते. शोभेच्या रुद्राक्षाच्या झाडाला खूप मोठी फुलं येतात, परंतु खऱ्या रुद्राक्षाला लहान फुलं असतात.’ ‘बऱ्याच लोकांना असं वाटतं की, एकमुखी किंवा पंचमुखी रुद्राक्ष वेगवेगळ्या झाडांना लागतात. पण असं अजिबात नाही. सर्व वेगवेगळ्या प्रकारचे रुद्राक्ष एकाच झाडाला लागतात. रुद्राक्षाच्या बिया सुद्धा मिळतात. पण आपल्याला जर रुद्राक्षाची लवकर वाढ व्हावी, त्याला लवकर फुलं व फळं यावीत, असं वाटत असेल तर त्याचे कटिंग (Cutting) किंवा नर्सरीमधून रोपटं आणून लावलेलं कधीही चांगलं. कटिंगद्वारे रुद्राक्षाचे रोपं लावायचं असेल तर हिवाळ्याच्या सुरूवातीस लावावं. त्यासाठी रुद्राक्षाच्या झाडाचे सुमारे आठ इंचाचे पेन्सिलच्या आकारचे कटिंग घ्यावं. वाळलेलं कटिंग घेऊ नये, असंही अनुराभ यांनी सांगितलं. ड्रायफ्रूट खाण्याचे आहेत अनेक फायदे; हरवलेला ‘तो’ आनंद येईल परत; पत्नी होईल खूश रुद्राक्ष लावण्यासाठी किमान 10 इंचाचं भांडं घ्यावं. त्यामध्ये 40% बागेतील माती, 20% वाळलेल्या पानांचं खत, 10% लाल माती, 10% वाळू आणि 20% शेण खत किंवा गांडुळ खत मिसळून पॉटिंग मिक्स (Potting Mix) तयार करावं. कटिंगचा अर्धा भाग पॉटिंग मिक्समध्ये रोवावा. त्याला स्प्रेनं पाणी मारावं. हे कलम केलेलं कटिंग वाढण्यास साधारणपणे एक महिना लागू शकेल. त्याला नियमितपणे पाणी घालत राहावं. एका वर्षासाठी कटिंगला रीपॉट (Repot) करण्याची आवश्यकता नाही. तसंच आपण जर पॉटिंग मिक्स बनविला असेल तर अजून एक वर्ष खतांचा वापर करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. परंतु आपल्याकडे जर सर्व गोष्टी उपलब्ध नसल्या तर आपण माती, खत आणि वाळू वापरू शकता. परंतु, रुद्राक्ष वनस्पतीसाठी पॉटिंग मिक्स कठोर असावं. रुद्राक्ष वनस्पतीस सूर्यप्रकाशाची गरज असते म्हणून त्याला चांगला सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवावं. सुमारे एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर वनस्पतीवर मायक्रोन्युट्रियंट द्रव्यांची फवारणी सुरू करू शकता. उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी द्यावं. अशाप्रकारे आपण नर्सरीमधून आणलेल्या रुद्राक्षाच्या रोपट्याला घरामध्ये किंवा बागेमध्ये लावू शकता. या वनस्पतीची चांगली वाढ झाल्यानंतर एक-दोन वर्षामध्ये त्याला फळं व फुलं येण्यास सुरवात होते. उन्हाळ्यामध्ये सुद्धा रुद्राक्षाला फुलं येतात आणि डिसेंबरपर्यंत ती फळं पिकू लागतात. काय सांगता! आता घामानेच चार्ज होणार मोबाईल फोन; चार्जर, पॉवर बँकची गरजच नाही अशाप्रकारे तुम्हीही रुद्राक्षाची रोपं तयार करू शकता आणि जर तुमच्याकडे जमिन असेल तर त्यावर ही रोपं लावू शकता. त्यामुळे वृक्षारोपण पण होईल आणि तुमच्या हातून चांगल्या वृक्षाची लागवड केल्याचं समाधानही तुम्हाला मिळेल.
    First published:

    Tags: Lifestyle

    पुढील बातम्या