कोरोना काळात करा हे खास योगासन; इम्युनिटीसह फुफ्फुसंही बनतील मजबूत

कोरोना काळात करा हे खास योगासन; इम्युनिटीसह फुफ्फुसंही बनतील मजबूत

नियमितपणे योगा (Yoga) केल्यास संसर्ग रोखण्यासाठी मदत होऊ शकते.

  • Share this:

मुंबई, 03 मे : कोरोना संसर्गाचा (Corona Infection) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आपण स्वत:ची अधिक काळजी घेणं आणि निरोगी राहणंअधिक महत्त्वाचं आहे. सध्या कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेत मोठ्या प्रमाणात लोक या आजाराला बळी पडत असून बहुतांश लोकांना श्वसनाला अधिक त्रास होत असल्याचं आढळलं आहे. अशा परिस्थितीत नियमितपणे योगा (Yoga) केल्यास संसर्ग रोखण्यासाठी मदत होऊ शकते. तसंच रोग प्रतिकारक (Immunity) शक्तीसह फुफ्फुसांची (Lungs) क्षमतादेखील वाढते.

सध्या अनेक लोक घरी राहून ऑफिसचं काम करत आहेत. त्यांनीही नियमित योगासनं करणं आवश्यक आहे. त्यामुळं ताण दूर करण्याबरोबरच खूप वेळ एकाच ठिकाणी बसल्यामुळे उद्भवणारी पाठदुखी, कंबरदुखी यासारख्या समस्याही दूर होऊ शकतील. आपल्या क्षमतेनुसार योगासनं करणं आवश्यक आहे. योग्य पद्धतीनं श्वास घेण्याच्या तंत्राचा उपयोग करून योगासनं करा.

ग्रीवा शक्तीविकासक आसन

हे आसन करण्यासाठी एकाजागी उभे रहा. ज्यांना उभं राहायला त्रास होतो ते बसूनही हे आसन करू शकतात. ज्यांना जमिनीवर बसता येत नाही ते खुर्चीवर बसूनही याचा अभ्यास करू शकतात. आरामदायक स्थितीत उभे रहा. कंबरेवर आपले दोन्ही हात ठेवा. शरीर सैल ठेवा. श्वास बाहेर सोडत मान पुढे न्या आणि हनुवटीला लॉक करा. ज्यांना मानेच्या दुखण्याचा त्रास आहे, त्यांनी हनुवटी लॉक न करता मान सैल सोडावी. यानंतर श्वास घेत मान मागे घ्या.

पूर्ण भुजाशक्ती विकास

ज्यांना कठीण आसनं जमत नाहीत तेदेखील हे आसन करू शकतात. हे आसन करण्यासाठी सावधान पवित्र्यात उभे रहा. यानंतर आपले दोन्ही पायाजवळ आणा. यानंतर आपल्या उजव्या हाताचा अंगठा आत आणि बोटे बाहेर ठेवून  घट्ट मुठकरा. त्यानंतर श्वास घेत उजवा हात खांद्याच्या पुढच्या दिशेने आणा आणि नंतर त्याच मार्गाने हात वर न्या. यानंतर आपल्या उजवा हात काही काळ असाच गोल फिरवावा. हीच प्रक्रिया डाव्या हातानं करा.

नौकासन

हे योगासन करण्यासाठी प्रथम आपल्या पाठीवर झोपा. आता आपले दोन्ही पायजवळ आणा आणि आपले दोन्ही हात शरीरालगत ठेवा. यानंतर एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना आपले दोन्ही हात पायांच्या दिशेला वर उचलत छाती वर उचला. एक दीर्घ श्वास घेऊन याच स्थितीत काही वेळ राहण्याचा प्रयत्न करा. नंतर श्वास सोडा आणि आराम करा.

शलभासन

शलभासन हा संस्कृत शब्द आहे. यात शलभ म्हणजे टोळ. शलभासन म्हणजे टोळासारखी स्थिती. या आसनाला इंग्रजीमध्ये ग्रासहॉपर पोज म्हणतात. यामुळे तुमच्या पाठीचा कणा मजबूत होतो.

हे वाचा - बायको कोरोनाग्रस्त, तिच्या आहाराची काळजी कशी घेऊ समजत नाहीये; तुमच्यासाठी टिप्स

वजन कमी करण्यासाठी शलभासन हा एक चांगलं आसन आहे. शरीरातील मेद दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो. शलभासनामुळे शरीरातील स्नायू बळकट होतात. हात, पाय, मांड्या आणि पोटऱ्या यामुळे बळकट होतात तसंच यामुळे पोटावरची चरबी कमी होते. मणक्याची हाडे बळकट करण्यासाठी शलभासन उत्तम आसन आहे. या आसनामुळे अनेक प्रकारचे रोग बरे केले जाऊ शकतात. यामुळे पचन सुधारते, बद्धकोष्ठता होत नाही. शरीरातील आम्लद्रव्ये आणि क्षार यांचं संतुलन राखलं जातं.

उष्ट्रासन

पाठीच्या कण्याच्या समस्या दूर करण्यासाठी हे एक प्रभावी आसन आहे. या आसनात, शरीर उंटांच्या आकारासारखे दिसते. या आसनात शरीर मागील बाजूस वाकवले जाते. यामुळे पाठीच्या कण्यावर सकारात्मक दाब निर्माण होतो. यामुळे पाठीचा कण्याच्या समस्या दूर होतात. यामुळे फुफ्फुसांची क्षमतादेखील वाढते.

वक्रासन

वक्रासन करण्यासाठी प्रथम जमिनीवर बसा आणि आपले दोन्ही पाय समोर ठेवा. आता एक पाय गुडघ्यातून वाकवा. आता या बाजूचा हात मागे घ्या आणि दुसरा हात वर करा आणि मागील बाजूस घ्या. थोडावेळ या स्थितीत बसून दीर्घ श्वास घ्या.

बटरफ्लाय आसन

हे आसन महिलांसाठी फायदेशीर आहे. हे आसन करण्यासाठी, आपले पाय समोर पसरवा. पाठीचा कणा ताठ ठेवा. गुडघे वाकवून दोन्ही पाय ओटीपोटाच्या दिशेने आणा. दोन्ही हातांनी दोन्ही पावलं घट्ट धरा. पायाच्या टाचा शक्य तितक्या गुप्तांगांच्याजवळ आणण्याचा प्रयत्न करा. एक लांब श्वास घ्या, श्वास बाहेर सोडत गुडघे आणि मांड्या जमिनीच्या दिशेने दाबा. नंतर फुलपाखराच्या पंखांप्रमाणे दोन्ही पाय खाली आणि वर हलवा. श्वास घ्या आणि श्वास सोडा.

हे वाचा - दगड, माती आणि बरंच काही...; 8 महिन्यांच्या बाळाला खायला देते ही आई कारण...

सुरुवातीला हे शक्य असेल तेवढाच वेळ करा नंतर हळूहळू सराव वाढवा.

First published: May 3, 2021, 11:51 AM IST

ताज्या बातम्या