दगड, माती आणि बरंच काही...; अवघ्या 8 महिन्यांच्या बाळाला खायला देते ही आई कारण...

दगड, माती आणि बरंच काही...; अवघ्या 8 महिन्यांच्या बाळाला खायला देते ही आई कारण...

तुम्ही तुमच्या बाळांना जे तोंडात घालण्यापासून रोखता अगदी तेच ही आई आपल्या बाळाला मुद्दामहून खायला देते.

  • Share this:

वॉशिंग्टन, 01 मे : लहान मुलांना त्यातही ते बाळ (Baby) असेल तर त्याला काय खावं आणि काय नाही हे समजत नाही. बाळ हाताला मिळणारी प्रत्येक वस्तू आपल्या तोंडात घालतं, त्याच्याजवळ एखादी वस्तू नेली की ती चाटण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी आपण शी हे तोंडात घालू नकोस असं म्हणून त्याच्या तोंडातील ती वस्तू काढून घेतो. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्ही तुमच्या मुलांना जी गोष्ट करण्यापासून रोखता अगदी तिच गोष्ट ही आई आपल्या बाळाला मुद्दामहून करायला देते.

फक्त घरातील एखादी स्वच्छ असलेली वस्तू नाही तर अगदी घराबाहेरील अस्वच्छ अशा गोष्टीही ती आपल्या अवघ्या 8 महिन्यांच्या बाळाला तोंडात घालायला देते. मग त्यात अगदी वाळू, माती, दगडसुद्धा (Baby eat sand rocks).

यूएसच्या एरिझोनातील 22 वर्षांची एलिस बेन्डरने (Alice Bender) आपल्या 8 महिन्यांचं बाळ फर्नचे काही व्हिडीओ टिकटॉकवर शेअर केले आहेत. ज्यात तो  समुद्रकिनारी वाळू खाताना दिसतं, दगडं तोंडात घालताना दिसतं, मॉलमध्ये शॉपिंग ट्रॉली चाटताना दिसतो. याजागी तुमचं बाळ असतं तर साहजिकच तुम्ही त्याला असं करण्यापासून रोखलं असतं. पण एलिस असं करत नाही, उलट ती आपल्या बाळाला हे सर्वकाही मुद्दामहून करू देते.

हे वाचा - पालकांनो लक्ष द्या! मुलांना कोरोना झाल्यास काय करावं? केंद्राने दिला सल्ला

बाळाची रोगप्रतिकारक शक्ती सुरक्षितरित्या विकसित करण्याचा हा मार्ग आहे. जर्म्स आपल्या बाळासाठी चांगले आहेत आणि ब्रेस्ट मिल्क हे त्यावरील औषध आहे. असा दावा एलिसने केला आहे.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार एलिस म्हणाली,  "जर्म्सना घाबरण्याची काहीच गरज नाही. बाळांमध्ये ही वृत्ती फक्त स्तनपान देतानाच असते. आईचं दूध हे बाळामध्ये रोगप्रतिकारक प्रणाली तयार करतं आणि त्यांचं संरक्षण करतं. 'आईचे दूध अविश्वसनीय आहे. आईचे दूध हे मूळ औषध आहे. कोणत्याही मानवनिर्मित औषधापेक्षा हे श्रेष्ठ आहे. बाळाच्या गरजेनुसार आपल्या ब्रेस्टमिल्कमध्येही बदल होत असतात"

बाळ जोपर्यंत स्तनपान करत आहे, "तोपर्यंत त्यांना अशा जर्म्सच्या संपर्कात येऊ द्यावं.  फर्नचं ब्रेस्टफिडिंग थांबल्यानंतर मी त्याला असं करून देणार नाही कारण त्यावेळी तो आजारी पडला तर त्यावेळी त्याच्याकडे असं काही नसेल", असंही ती म्हणाली.

हे वाचा - संसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी वाढवा प्रतिकारशक्ती, असा ठेवा आहार

"निसर्गाशी युद्ध करायला नको. आपण निसर्ग आहोत. माझा मुलगा फर्न इतर मुलांच्या तुलनेत हेल्दी असल्याचं मला दिसलं. आमच्या कुटुंबात तर तो पहिला गुडगुडीत मुलगा आहे. जेव्हा आम्ही त्याला बाहेर नेतो तेव्हा लोक हा इतका हेल्दी, शांत कसा, असं विचारतात", असं तिनं सांगितलं.

एलिस ज्या पद्धतीने आपल्या मुलाला वाढवत आहे, त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांनी तिचं समर्थन केलं आहे तर काही जणांनी बाळाच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

Published by: Priya Lad
First published: May 1, 2021, 3:11 PM IST

ताज्या बातम्या