Home /News /lifestyle /

Yoga And Music : योगासनं करताना ऐका संगीत, योगासनांचा होईल अधिक फायदा

Yoga And Music : योगासनं करताना ऐका संगीत, योगासनांचा होईल अधिक फायदा

असे मानले जाते की संगीत हा उपचाराचा एक प्रकार आहे आणि योगा देखील आहे. त्यामुळे, दोन्ही एकत्र केल्याने तुम्हाला अफाट आंतरिक शांती मिळू शकते. त्याचबरोबर संगीत योगासनांमुळे मिळणारे फायदे वाढवू शकते.

  मुंबई, 2 जुलै : योगा ही केवळ शारीरिक क्रिया नसून ती आपल्या मनासाठी आणि आत्म्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे, असे वेळोवेळी सांगण्यात आले आहे. योगामुळे (Yoga) आपल्या शरीराला आराम मिळतो आणि मन तणावमुक्त होते. योगामुळे स्नायू ताणले जातात आणि वजन कमी (Weight Loss) करण्यास मदत होते. याच योगासनांसोबत जर आपण संगीताची (Music) जोड दिली तर? होय, असे मानले जाते की संगीत हा उपचाराचा एक प्रकार आहे आणि योगा देखील आहे. त्यामुळे, दोन्ही एकत्र केल्याने तुम्हाला अफाट आंतरिक शांती मिळू शकते (Music Enhance Benefits of Yoga). आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, संगीत योगासनांमुळे मिळणारे फायदे वाढवू शकते. एकाग्रतेत मदत होते तुमचे राहणीमान आणि एकाग्रता (Concentration) सुधारण्यासाठी संगीत हा एक उत्तम मार्ग असल्याचे म्हटले जाते. समजा तुम्ही एखादे काम करत आहात आणि त्याचसोबत तुम्ही पार्श्वभूमीत संगीत वाजवत असाल. तर काम करताना तंतुमच्या मनावर येणार ताण बऱ्याच प्रमाणात कमी होतो. त्याचबरोबर तुमची एकाग्रता वाढते ज्यामुळे तुमच्या मन आणि आत्म्याला योगाचा पूर्ण लाभ घेता येतो.

  घरच्या-घरी असा बनवा संत्र्याच्या सालीचा साबण; स्किनसाठी आणखी काही करण्याची नाही गरज

  ताण तणाव होतो कमी जेव्हा तुम्ही शांततेत योगा करत असता तेव्हा तुमचे मन तुमच्या चिंता आणि चेतनेच्या मोठ्या आवाजाने विचलित होऊ शकते. मन या गोष्टींमध्ये गुंतू नये यासाठी तुम्हाला कशाचीतरी गरज असते. अशावेळी संगीत विचार शांत करण्याचा आणि तणाव कमी (Relieves Stress) करण्याचा उत्तम मार्ग आहे. सॉफ्ट आणि इंस्ट्रुमेंटल संगीतामध्ये उपचारात्मक गुणधर्म आहेत जे तणाव कमी करण्यासाठी चमत्कार करू शकतात. तुमचा मूड सुधारते मूड सुधारण्यासाठी तुम्हाला केवळ तुमचे आवडते गाणे पुरेसे आहे. हेच गाणे किंवा संगीत योगामध्ये मिसळल्यास, ते तुम्हाला आनंदी बनवू शकते आणि योगाचे बरेच फायदे देऊ शकते. तुम्ही सर्व आसन चांगल्या मूडमध्ये (Boosts Your Mood) कराल आणि तुम्ही प्रेरित राहाल म्हणून अत्यंत परिपूर्णतेने कराल. Earth day: आपण सगळे करू शकतो, पृथ्वीला वाचवू शकतो! फक्त 5 गोष्टी आजपासून करूया तुमचे शरीर डिटॉक्स करते संगीताचे लयबद्ध आवाज तुमच्या हालचालींना योग्य दिशा देण्यास मदत करतात. लय सोबत श्वास घेताना तुम्ही जास्त ऑक्सिजन घेता. शरीरातील ऑक्सिजनचा योग्य प्रवाह हृदयाचे ठोके आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करतो (Detoxifies Your Body) ज्यामुळे आपल्याला पुन्हा टवटवीत आणि निरोगी वाटते.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle

  पुढील बातम्या