Home /News /lifestyle /

Health Tips : आहारात तुम्ही 'हे' अन्नपदार्थ खात असाल तर आहे लिव्हरला आहे धोका

Health Tips : आहारात तुम्ही 'हे' अन्नपदार्थ खात असाल तर आहे लिव्हरला आहे धोका

आपल्या आरोग्याची (Health) काळजी घेत असताना आपल्याला काही गोष्टींचं पथ्य पाळावं लागतं. काही पदार्थ आवर्जून खाल्ले आणि काही टाळले तर यकृत चांगलं राहतं आणि त्यामुळे आपण भविष्यात होणाऱ्या धोक्यांना टाळू शकतो.

    दिल्ली, 15 सप्टेंबर : आपल्या आरोग्याची (Health) काळजी घेत असताना आपल्याला काही गोष्टींची पथ्यं पाळावी लागतात. त्यामुळे आपण भविष्यात आपल्याला होणाऱ्या रोगांच्या धोक्याला टाळू शकतो. आपल्या शरीरात हेल्दी लिव्हर (Worst Foods For Liver) राहणं हे संपूर्ण शरीरासाठी फार महत्त्वाचे आहे. कारण लिव्हर  म्हणजे यकृत हे आपल्या शरीरातील मेटाबॉलिझमला नियंत्रित ठेवतो. यकृत शरीरातील विषयुक्त पदार्थांपासून (Foods Diseases) शरीराचे रक्षण करतं. आपल्या दीर्घायुष्यासाठी यकृत चांगलं राहणं फार गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला आहार हा योग्य प्रकारचा आणि आपण खात असलेल्या पदार्थांचं हेल्दी असणे आवश्यक असते. त्यासाठी आपण आहारात काही गोष्टींचा समावेश केला तर आपले लिव्हर हे मोठ्या कालावधीसाठी हेल्दी आणि निरोगी ठेवतो. त्यासाठी आपल्याला काही गोष्टींचा काळजी घ्यावी लागते, ती कोणती आहे हे आपण जाणून घेऊयात. Bad Habits For Health: तुम्हाला 'या' वाईट सवयी असतील आरोग्याला आहे मोठा धोका जर तुम्हाला गोड पदार्थ खायला आवडत असेल ते जास्त प्रमाणात खाणे हे आपल्या लिव्हरला धोका पोहचवू शकतो. कारण गोड पदार्थांना पचवण्यात लीवरला मोठा कसरत करावी लागते. सातत्याने गोड पदार्थांचे सेवन केल्यामुळे लिव्हरची समस्या निर्माण होऊ शकते. जर तुम्ही नियमितपणे फ्रेंच फ्राइज खात असाल तर त्यामुळे लिव्हरमध्ये फॅट जमा व्हायला लागतो आणि त्यातून इन्फ्लेमेशनचा धोका तयार होत असतो. त्यामुळे अनेक प्रकारच्या डिजीजचा धोका आपल्या शरिराला होत असतो. त्याचबरोबर प्रोसेस्ड मीटच्या सेवनामुळेही त्यात असलेल्या अतिरिक्त फॅटमुळे आपल्या लिव्हरला धोका निर्माण होतो. कारण हे आपल्या आहरातील सर्वात धोकादायक फुड मानले गेले आहे.
    Published by:Atik Shaikh
    First published:

    Tags: Health, Health Tips, Processed food

    पुढील बातम्या