मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

‘द ग्रेट खली’पेक्षाही उंच आहे एक स्त्री; एका गंभीर आजारामुळे वाढली उंची

‘द ग्रेट खली’पेक्षाही उंच आहे एक स्त्री; एका गंभीर आजारामुळे वाढली उंची

‘द ग्रेट खली’पेक्षाही उंच महिला

‘द ग्रेट खली’पेक्षाही उंच महिला

तुर्कीमधल्या रुमेसा बेलगी या 25 वर्षांच्या मुलीची उंची 7 फूट 7 इंच आहे. भारतीय पहिलवान दलीप सिंह राणा म्हणजेच ‘द ग्रेट खली’पेक्षाही तिची उंची जास्त आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

उंची वाढवण्यासाठी कोणी गोळ्या-औषधांची मदत घेतं, तर कोणी व्यायामाला पसंती देतं. आता तर उंची वाढवण्यासाठी खर्चिक शस्त्रक्रियाही केल्या जात आहेत. एकीकडे उंची वाढवण्यासाठी वैद्यकीय मदत घेतली जात असताना दुसरीकडे जगातली सर्वांत उंच स्त्री मात्र उंची खूप जास्त वाढल्यामुळे वैद्यकीय मदत घेत आहे. तुर्कीमध्ये राहणारी रुमेसा गेलगी ही जगातली सर्वांत उंच स्त्री आहे. तिची उंची तब्बल 7 फूट 7 इंच आहे. यामुळे तिची नोंद गिनीज बुकमध्येही झाली आहे. वीव्हर सिंड्रोम नावाच्या जनुकीय विकारामुळे तिची उंची अशा प्रकारे वाढली आहे. हा आजार काय आहे, त्याबाबत जाणून घेऊ या. 'आज तक'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

तुर्कीमधल्या रुमेसा बेलगी या 25 वर्षांच्या मुलीची उंची 7 फूट 7 इंच आहे. भारतीय पहिलवान दलीप सिंह राणा म्हणजेच ‘द ग्रेट खली’पेक्षाही तिची उंची जास्त आहे. ‘द ग्रेट खली’ची उंची 7 फूट 1 इंच आहे. रुमेसाच्या नावावर तीन वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. सर्वांत उंच जिवंत तरुणी, 4.4 इंचाचं जिवंत महिलेचं बोट, जिवंत महिलेची सर्वांत लांबीची पाठ हे 23.58 इंचाचं वर्ल्ड रेकॉर्ड अशा तीन जागतिक विक्रमांची नोंद तिच्या नावावर आहे. हाताच्या सगळ्यात मोठ्या पंजाचा विक्रमह तिच्याच नावावर आहे. तिचा उजवा हात 9.81 इंच, तर डावा हात 9.55 इंच लांब आहे. आजवर रुमेसाच्या या उंचीची अनेकांनी चेष्टा केली आहे; मात्र तिची ही उंची एका गंभीर जनुकीय आजारामुळे वाढलेली आहे.

त्याबद्दल तिनं ‘द मिरर’ला सांगितलं, “अनेकांनी माझ्या उंचीची चेष्टा केली; मात्र यामुळे मी खंबीर बनले.” आता ती अशा नकारात्मक गोष्टींमुळे खचून जात नाही. अशा पद्धतीचा आजार कोणाला असेल व इतरांपेक्षा ती व्यक्ती वेगळी असेल, तर अशा व्यक्तींनी घाबरून जाऊ नये असं आवाहन ती करते. आपण स्वतःही लहानपणापासून इतरांपेक्षा वेगळे होतो व उंचीही लहानपणापासून जास्त होती; मात्र आता इतके जागतिक विक्रम केल्याचा आनंद असल्याचं तिचं म्हणणं आहे.

हेही वाचा - National Cooking Day : तुमच्या हातच्या खाद्यपदार्थांनाही येईल हॉटेल स्टाईल फूडची चव; हे आहे सिम्पल मॅजिक

रुमेसा व्हीलचेअर किंवा काठीचा वापर करून चालते. तिच्या उंचीमुळे तिला वेगानं चालता येत नाही. ती जेवतेही हळूहळू. कारण पटापट जेवलं तर घास अडकू शकतो. याशिवाय तिला श्वास घेण्यात व ताठ उभं राहण्यातही समस्या आहेत. हे सगळं वीव्हर सिंड्रोम या आजारामुळे झालं आहे. या आजारात हाडांची लांबी नेहमीपेक्षा खूप जास्त व वेगानं वाढते. चेहऱ्याचे स्नायूही वाढतात. त्यामुळे लांब नाक, मोठे डोळे, रुंद कपाळ असा चेहरा दिसतो. या विकाराच्या अनेक रुग्णांमध्ये विचार करण्याची, तसंच आकलन क्षमताही हळूहळू कमी होते. अजून तरी यावर काही उपचार नाही; मात्र हे रुग्ण सामान्य जीवन जगू शकतात.

हेही वाचा - Fitness Tips : जिम की मोकळ्या हवेत; कोणत्या ठिकाणी Excercise करण्याचा अधिक फायदा?

जनुकात बदल झाल्यामुळे हा आजार होतो. वीव्हर सिंड्रोमला EZH2 हे जीन म्हणजेच जनुक कारणीभूत असतं. जेव्हा त्या जनुकामध्ये म्युटेशन म्हणजेच बदल होतो, तेव्हा हाडांची वाढ वेगानं होते. या जीनचा शरीरातल्या इतर जीन्सवरही प्रभाव पडतो. यामुळे इतर लक्षणं दिसू लागतात. यामुळे शारीरिक समस्या उद्भवू शकतात. रुमेलाला या आजारानं ग्रासलं आहे. त्यामुळे तिच्या सहज वावरण्यात अडचणी निर्माण होत आहेत; मात्र त्याकडे नकारात्मक दृष्टिकोनातून न पाहता तिनं सर्वांनाच सकारात्मकतेचा संदेश दिला आहे.

First published:

Tags: Health, Lifestyle, Medical