मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /OMG! 9 नाही तर 15 महिन्यांचं बाळ; तब्बल 16 तासांनंतर आईच्या पोटातून आलं बाहेर

OMG! 9 नाही तर 15 महिन्यांचं बाळ; तब्बल 16 तासांनंतर आईच्या पोटातून आलं बाहेर

बाळाच्या जन्मानंतर त्याला पाहून डॉक्टरही शॉक झाले.

बाळाच्या जन्मानंतर त्याला पाहून डॉक्टरही शॉक झाले.

बाळाच्या जन्मानंतर त्याला पाहून डॉक्टरही शॉक झाले.

ब्रिटन, 09 जुलै: सामान्यपणे बाळ (Baby) नवव्या महिन्यात जन्माला (Baby born) येतं. पण 15 महिन्यांचं बाळ जन्मल्याचं (Baby birth) कधी ऐकलं आहे का? पण एका महिलेनं 15 महिन्यांच्या बाळाला जन्म दिला आहे. तब्बल 16 तास प्रसूती वेदना सहन केल्यानंतर या बाळाचा जन्म (Biggest Baby Born) झालं.  आता हे कसं शक्य आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल नाही का?

इंग्लंडमध्ये (England) राहणारी जेड बेअरने (Jade Beyer) नुकतंच आपल्या चौथ्या मुलाला जन्म दिला आहे. बेअर 5 एप्रिलला ती रुग्णालयात डिलीव्हरीसाठी गेली. तिच्या मते, आपण नऊ नाही तर पंधरा महिन्यांच्या बाळाला जन्म दिला आणि यामुळेच ती  डिलिव्हरीनंतर चर्चेत आहे.

आई होणं हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील एक सुंदर क्षण असतो. 9 महिने बाळाला आपल्या पोटात वाढवणं. त्यावेळी तिला अनेक समस्यांनाही सामोरं जावं लागतं आणि बाळाच्या जन्मावेळी तिला असह्य अशा प्रसूती वेदनाही सहन कराव्या लागतात. 9 महिन्यांच्या बाळाला जन्म देतानाच इतका त्रास होतो मग विचार करा ते बाळ 15 महिन्यांच्या बाळाइतकं असल्याने त्या महिलेचं काय झालं असेल. तब्बल 16 तास ही महिला प्रसूती वेदना सहन करत होती. तब्बल 16 तास डॉक्टर आणि नर्सने प्रयत्न केले. अखेर 16 तासांनी बाळ गर्भातून बाहेर आलं.

हे वाचा - 'मी इतकी सुंदर, हॉट पण एकही बॉयफ्रेंड पटेना', मॉडेलने मांडली आपली अजब व्यथा

बेअर सांगते, आतापर्यंत मी तीन मुलांना जन्म दिला पण इतक्या वेदना कधीच झाल्या नाहीत. सामान्यपणे महिला नवव्या महिन्यात बाळाला जन्म देतात पण मी पंधराव्या महिन्यात दिला असंच मला वाटतं आहे.

बाळाला पाहताच सर्वांना शॉक बसला. सामान्य बाळापेक्षा 6 महिने जास्त मोठं होतं हे बाळ. डॉक्टरांनी सांगितलं, रोनीची नाळ एखाद्या दोरीसारखं मोठं होतं. जन्मावेळी त्याचं वजन 5 किलो 100 ग्रॅम होतं. चक्क 15 महिन्यांच्या बाळाच्या वजनाइतकं याचं वजन होतं. म्हणजे हे बाळ नवव्या महिन्यातच जन्माला आलं आहे. पण त्याचं वजन 15 महिन्यांच्या बाळाइतकं आहे. ब्रिटनमधील सर्वात जास्त वजनाचं बाळ म्हणून याचा रेकॉर्ड झाला आहे.

हे वाचा - नवरदेवाच्या स्वागताला आली खुद्द नवरी, आधी पुष्पहार घातला नंतर...; VIDEO VIRAL

बेअरने आपल्या या बाळाचं नाव रोनी जय ठेवलं आहे. तिनं त्याच्यासाठी कपडेही खरेदी केले होते. पण आता त्याचा काहीही उपयोग नाही. बेअर सांगते, रोनीचा आहारही तगडा आहे. ती त्याला दूध पाजते ते कमीच पडतं. मग त्याला बाजारातील दूध द्यावं लागतं. पोट भरलं की तो शांत झोपतो.

First published:
top videos

    Tags: Lifestyle, Pregnancy, Pregnant woman, Small baby