Home /News /lifestyle /

World Rose Day 2021:कॅन्सरच्या रुग्णांसाठी रोज डे आहे खास; जाणून घ्या कारण

World Rose Day 2021:कॅन्सरच्या रुग्णांसाठी रोज डे आहे खास; जाणून घ्या कारण

दरवर्षी 22 सप्टेंबर हा दिवस जागतिक रोज दिन (World Rose Day) म्हणून जगभर साजरा केला जातो.

मुंबई, 22 सप्टेंबर-  दरवर्षी 22 सप्टेंबर हा दिवस जागतिक रोज दिन (World Rose Day) म्हणून जगभर साजरा केला जातो. तो साजरा करण्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे कॅन्सरसारख्या महाभयंकर जीवघेण्या आजाराशी दोन हात करून त्याच्याशी खंबीर लढा देणाऱ्या रुग्णांसाठी आशेचा किरण हा दिवस दाखवतो. धीराने आणि सकारात्मकतेने कॅन्सरशी (fight against Cancer) लढा देणाऱ्या रुग्णांचा गौरव करण्यासाठी जागतिक रोज डे साजरा केला जातो. कॅन्सर हा दीर्घकाळ झुंजवतो. उपचारांदरम्यान शारीरिक त्रास (Physical Pain) तर होतोच पण त्यासोबतचा मानसिक ताण असह्य असतो. या आजाराशी लढणं इतकं त्रासदायक असतं की रुग्णाची मानसिक कसोटी लागते त्याला धीरानं आणि सकारात्मकतेनं परिस्थितीचा सामना करावा लागतोच पण त्या व्यक्तीच्या नातेवाईकांनाही तशाच पद्धतीचं धीराने काम करावं लागतं आणि त्या व्यक्तीला आधार द्यावा लागतो. धीराने आणि सकारात्मकतेने कॅन्सरशी लढा (Positive fight against Cancer)देणाऱ्या रुग्णांचा गौरव करण्यासाठी जागतिक रोज डे साजरा केला जातो. तसंच कॅन्सरचं लवकर निदान करून त्यावर उपचार करण्यासंबंधी जनजागृती करण्यासाठीही हा दिवस साजरा केला जातो. कॅनडातील 12 वर्षांची मेलिंडा रोज हिला खूप लवकर ब्लड कॅन्सर झाला. तिने आपल्या सहा महिन्यांच्या काळात तिने ब्लड कॅन्सरशी (Blood Cancer) निकराची झुंज दिली. मेलिंडाला अस्किन ट्युमर हा ब्लड कॅन्सर झाला होता. पण शेवटच्या श्वासापर्यंत तिनी अजिबात हार मानली नाही. या दिवसात तिने आपल्या सकारात्मकतेने तिला पाठिंबा देणाऱ्यांना हसतं ठेवलं. (हे वाचा:वजन कमी करण्याच्या नादात तुम्ही अशा चुका तर करत नाही ना? या बाबी ठेवा ध्यानात) मेलिंडाने तिच्या आजुबाजूला असलेल्या कॅन्सर पीडितांसाठी कविता, पत्रं आणि ई-मेल लिहिले आणि कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये (Cancer Treatment) खंबीर राहण्यासाठी त्यांना मदत केली. त्यांना पाठिंबा दिला. मेलिंडाला ज्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं त्या हॉस्पिटलमधील संपूर्ण वातावरण आनंदानी भारलेलं, बहरलेलं असावं यासाठी ती प्रयत्न करत राहिली. तिनी इतर कॅन्सर पेशंटच्या आयुष्यात आनंद आणण्याचंच मिशन हाती घेतलं होतं. त्यामुळे मेलिंडाने धैर्याने कॅन्सरशी दिलेल्या लढ्यासोबतच इतर रुग्णांना दिलेल्या प्रेरणेच्या गौरवाप्रीत्यर्थ तिच्या मृत्युनंतर जागतिक रोज डे साजरा केला जातो. (हे वाचा:काय? पृथ्वीला वाचवायचं आहे तर न धुतलेलेच कपडे घाला; तज्ज्ञांनी दिला अजब सल्ला) मेलिंडा रोजच्या आठवणीप्रीत्यर्थ जगभर लोक कॅन्सर पेशंटना (Cancer Patient) गुलाबाची फुलं पाठवतात. तसंच त्यांची काळजी घेणाऱ्यांनाही अशी फुलं पाठवतात आणि या भयंकर आजाराचा सामना करण्यासाठी त्यांना पाठिंबा देतात. ते जो खंबीर लढा देतात त्याचाही गौरव या निमित्ताने केला जातो. लोक भेटकार्ड आणि काही विशेष भेटवस्तूही कॅन्सर पेशंटना देतात. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था कॅन्सरशी यशस्वी लढा दिलेल्या व्यक्तींच्या मदतीने जनजागृतीही करतात.  अशा पद्धतीने जागतिक रोज डे साजरा केला जातो.
First published:

Tags: Cancer, Lifestyle, Rose

पुढील बातम्या