• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • काय? पृथ्वीला वाचवायचं आहे तर न धुतलेलेच कपडे घाला; तज्ज्ञांनी दिला अजब सल्ला

काय? पृथ्वीला वाचवायचं आहे तर न धुतलेलेच कपडे घाला; तज्ज्ञांनी दिला अजब सल्ला

वारंवार कपडे धुतल्याने पृथ्वी धोक्यात असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

  • Share this:
मुंबई, 22 सप्टेंबर : स्वच्छ कपडे घालणं सर्वांनाच आवडतं. कपडे नियमितपणे धुतल्यामुळे ते स्वच्छ होतात, त्यांना दुर्गंधी येत नाही. विशेषतः बाहेर जायचं म्हटलं, की कोणतीही व्यक्ती धुतलेले कपडेच (Clean Clothes) वापरण्याला पसंती देते. स्वच्छ कपड्यांमुळे तुम्ही आजारांपासूनही बचाव करू शकता. यासोबतच स्वच्छ कपडे वापरण्याचे आणखी बरेच फायदे आहेत. मात्र कपडे वारंवार धुण्याच्या आपल्या सवयीमुळे पृथ्वीचं नुकसान (Side effect of clean clothes) होत आहे. पृथ्वीला नष्ट होण्यापासून वाचवायचं असेल, तर एकदा वापरलेले कपडे, तसेच पुन्हा वापरण्याचा सल्ला (Wear dirty clothes to save earth) तज्ज्ञांनी दिला आहे. सोसायटी ऑफ केमिकल इंडस्ट्रीच्या (Society of chemical industries) तज्ज्ञांनी याबाबत अहवाल सादर केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉशिंग मशीनचा (Use of washing machine) वापर वाढला आहे, तेव्हापासून पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होताना दिसून येत आहे. केवळ एकदा वॉशिंग मशीन वापरल्यावर आपण सुमारे सात लाखांहून अधिक मायक्रोस्कोपिक प्लॅस्टिक फायबर (Microscopic plastic fiber) वातावरणात सोडतो. हे प्लास्टिक फायबर खरं तर आपल्या कपड्यांमधून निघालेले असतात, जे पाण्यावाटे नदी-नाल्यांमध्ये पोहोचतात. याचा त्या स्रोतामध्ये राहणाऱ्या जलचरांवर दुष्परिणाम होतो. हे वाचा - पर्यावरण संरक्षणासाठीचा अजब फंडा! सायकवरून विवस्त्र फिरतं हे जोडपं यासोबतच, कपडे वारंवार धुतल्यामुळे (Disadvantage of washing clothes) त्यांची अधिक वेगाने झीज होते. त्यामुळे त्यांचं आयुष्यही कमी होतं. यामुळेच संशोधकांनी कपडे धुण्याबाबत काही टिप्स दिल्या आहेत. या टिप्स (Tips to increase cloth life) फॉलो केल्या, तर तुमच्या कपड्यांचं आयुष्य वाढेल. तसंच पर्यावरणाचं नुकसानही बऱ्याच प्रमाणात कमी करता येणार आहे. सस्टेनेबल क्लोदिंग ग्रुपच्या को-फाउंडर ओर्सोला डी कॅस्ट्रो यांनी सांगितलं, की आधी जेव्हा वॉशिंग मशीन्स नव्हती, तेव्हा लोकांना कपडे धुताना बऱ्याच अडचणी येत. त्यामुळे ते अगदी कमी वेळा कपडे धुवत. हीच गोष्ट आता आपण पुन्हा करायची आहे. हे वाचा - पुढच्या वर्षी पृथ्वीवर येणार एलियन्स? 'टाइम ट्रॅव्हलर'चा भयावह दावा संशोधकांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, जीन्स महिन्यातून एकदाच धुण्यात (Clothes washing tips) यावी. ट्राउझर किंवा जम्पर्स सुमारे 15 दिवसांतून एकदा धुवावेत. पायजमा तुम्ही आठवड्यातून एकदा (Wear dirty clothes for environment) धुऊ शकता. या रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे, की जिममध्ये किंवा व्यायाम करताना वापरलेले कपडे आणि अंडरवेअर्स, म्हणजे आतले कपडे दररोज धुतले गेले पाहिजेत; मात्र ते वॉशिंग मशीनमध्ये न धुता, हातानेच धुवावेत. महिलांसाठी या रिपोर्टमध्ये विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. एक टॉप साधारणपणे पाच वेळा वापरल्यानंतर धुवावा, तसंच ड्रेसेस चार ते सहा वेळा वापरल्यानंतर धुवावेत, असे संशोधकांनी म्हटले आहे. तसंच, महिलांनी आपल्या ब्रा आठवड्यातून एकदा धुवाव्यात, असाही सल्ला त्यांनी दिला आहे. यामुळे वॉशिंग मशीनचा वापर कमी होऊन, पर्यावरणाचं नुकसान मोठ्या प्रमाणात आटोक्यात येण्यास मदत होणार असल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे.
First published: