मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

वजन कमी करण्याच्या नादात तुम्ही अशा चुका तर करत नाही ना? या बाबी ठेवा ध्यानात

वजन कमी करण्याच्या नादात तुम्ही अशा चुका तर करत नाही ना? या बाबी ठेवा ध्यानात

लठ्ठपणा कमी करण्याचा अर्थ असा नाही की, आपण भुकेले राहता किंवा काहीही खात नाही. वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणे किंवा कमी खाण्यात काहीच अर्थ नाही. यासाठी तुम्हाला संतुलित आणि योग्य आहाराची गरज आहे.

लठ्ठपणा कमी करण्याचा अर्थ असा नाही की, आपण भुकेले राहता किंवा काहीही खात नाही. वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणे किंवा कमी खाण्यात काहीच अर्थ नाही. यासाठी तुम्हाला संतुलित आणि योग्य आहाराची गरज आहे.

लठ्ठपणा कमी करण्याचा अर्थ असा नाही की, आपण भुकेले राहता किंवा काहीही खात नाही. वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणे किंवा कमी खाण्यात काहीच अर्थ नाही. यासाठी तुम्हाला संतुलित आणि योग्य आहाराची गरज आहे.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 22 सप्टेंबर:  जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, जगभरात 1.9 अब्ज लोक जास्त वजनाने (Obesity problem worldwide) त्रत आहेत. याचा अर्थ 7 पैकी 2 लोक लठ्ठ आहेत. लठ्ठपणा ही संपूर्ण जगासाठी एक समस्या बनली आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी लोक अनेक उपाय (weight loss )करत असतात. काही लोक अन्न सोडतात, तर काही लठ्ठपणा कमी (weight loss diet) करण्यासाठी विशेष आहाराचे पालन करतात, परंतु लठ्ठपणा (Mistakes during weigh loss) कमी करण्याचा अर्थ असा नाही की, आपण भुकेले राहता किंवा काहीही खात नाही. वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणे किंवा कमी खाण्यात काहीच अर्थ नाही. यासाठी तुम्हाला संतुलित आणि योग्य आहाराची गरज आहे. जर तुम्ही विशेष आहाराचे पालन करूनही वजन कमी होत नसेल तर तुम्हाला पुन्हा खाण्या-पिण्याचा विचार करण्याची गरज आहे. याचा अर्थ असाही होऊ शकतो की तुम्ही तुमच्या आहारामध्ये अनेक चुका करत आहात. यासाठी आपण कोणत्या चुका करत आहात हे जाणून घेणे महत्वाचे आहे. पोषणतज्ज्ञ नॅन्सी डेहरा यांनी इन्स्टाग्रामवर यासाठी आवश्यक गोष्टी सांगितल्या आहेत. वजन कमी करण्यासाठी लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी वजन कमी करण्यासाठी सॅलड आणि फायबर युक्त पदार्थ खाणे ही चांगली गोष्ट आहे, पण जेव्हा आपण सॅलडमध्ये अनेक गोष्टी मिसळतो तेव्हा आपण अनेकदा त्यातून मिळणाऱ्या कॅलरीज विसरतो. हे वाचा - बापाच्या अंगात सैतान शिरला, 4 वर्षांच्या मुलाला रेल्वे स्टेशनवर आपटून आपटून ठार मारले, LIVE VIDEO जेव्हा आपण वजन कमी करत असता, मात्र जेवताना आपल्या ताटात सॉस, लोणचं किंवा तत्सम काही  आलं तर तोंडाला अनेकदा पाणी सुटतं आणि आम्हाला वाटतं की सॉसमध्ये अशा किती कॅलरीज असतील.. चालतंय की! खाऊ या. पण लक्षात ठेवा की व्हाईट सॉस पास्ताच्या दोन बाइटमध्ये 80 ते 120 कॅलरीज असतात. घरात फिरणं थर्मोजेनेसिसची प्रक्रिया वाढवू शकते. शरीरातील अति उष्णतेमुळे ऊर्जेचे जळणे याला थर्मोजेनेसिस म्हणतात. त्यामुळे घरात, अंथरुणावर बसून राहण्यापेक्षा घरातल्या घरात, घराभोवती फिरणं चांगलं. Weight Loss साठी टिप्स जास्त फळे खाल्ल्याने देखील नुकसान होऊ शकते. फळांमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स आढळतात. परंतु त्यांच्यापासून किती कॅलरीज बनतात, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. हे वाचा - बायकोच्या भाचीवर जडलं प्रेम, 12 वर्षांचा संसार मोडून चौथ्या मुलाचा बाप बनण्याच्या तयारीत ‘हा’ फुटबॉलर! काय केले पाहिजे जेवताना हळूहळू खाल्ले पाहिजे, अन्न जास्त वेळा चावून मग गिळले पाहिजे. भुकेचे सूत्र समजून घ्या, जेव्हा तुम्हाला वाटते की आपली 80 टक्के भूक आता पूर्ण झाली आहे, तेव्हा खाणे बंद करा. अन्न संतुलित पद्धतीनं खाल्लं पाहिजे. फायबर आणि प्रथिने योग्य प्रमाणात मिळतील याची काळजी घ्या.
First published:

Tags: Health Tips, Weight, Weight loss

पुढील बातम्या