मुंबई, 27 फेब्रुवारी: धूम्रपान (Smoking is dangerous to health) आरोग्यासाठी घातक असतं, हे आपल्याला माहिती आहे. त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. हे जाणूनही काही जणांना धूम्रपान करतात. पण तुम्हांला माहिती आहे का, काही सिगरेट अतिशय महागड्या असतात. जाणून घ्या अशाच काही महागड्या सिगरेट ब्रँड्सबद्दल ज्या जगातील सर्वांत महागड्या सिगरेट (Expensive Cigarette Brands) मानल्या जातात. त्यांची किंमत तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते. जगात सिगरेट चे अनेक ब्रँड उपलब्ध आहेत. यातील प्रत्येक सिगरेट चा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. पण असे काही ब्रँड्स आहेत, ज्यांची किंमत पाहूनच तुम्ही अवाक् व्हाल. जर आपण जगातील सर्वांत महागड्या सिगरेट बद्दल बोललो तर त्याचे नाव ट्रेझर आहे. हे इंग्लंडच्या कंपनीचे उत्पादन आहे. तिथे हा ब्रँड खूप प्रसिद्ध आहे. त्याच्या किमतीबद्दल बोलायचं झालं तर या सिगरेट चे एक पॅकेट साडेचार हजार रुपयांना मिळते. एका पॅकमध्ये 10 सिगरेट असतात. म्हणजे एका सिगरेट ची किंमत तब्बल 450 रुपये आहे. हे वाचा- चुरा होईल म्हणून नाही तर ‘या’ कारणामुळे चिप्स पॅकेटमध्ये भरला जातो स्पेशल गॅस जगातील सर्वात जुन्या सिगारेच ब्रँडमध्ये सोब्रानीचादेखील समावेश होतो. याच्या एका पॅकेटची किंमत 800 ते 1200 रुपयांपर्यंत आहे. तसेच डेव्हिड ऑफ सिगरेट देखील प्रचंड महाग आहे. हा स्विस ब्रँड असून एका पॅकची किंमत एक हजार रुपये आहे. याशिवाय पार्लियामेंट सिगरेटदेखील फार महाग असते. या सिगारटेची किंमत ही 350 ते 600 रुपयांपर्यंत असते. ही सिगरेट तीन वेगवेगळ्या किंमतीमध्ये मिळते. ऑस्ट्रियाचा नॅट शर्मन ब्रँडही जगभरात खूप प्रसिद्ध आहे. जगातील सर्वात महागड्या सिगरेट च्या यादीत हा पाचव्या क्रमांकावर आहे. ही कंपनी 1930 मध्ये स्थापन झाली होती. या सिगरेट च्या एका पॅकेटची किंमत तब्बल 700 रुपये आहे. सिगरेट ही आरोग्यासाठी वाईट तर असतेच, पण सिगरेट च्या किमती पाहिल्यानंतर खर्चाच्या दृष्टिनंही ती न ओढणंच बरं आहे असं वाटू शकतं. हे वाचा- खरंच तुम्हाला सिगरेटचं व्यसन सोडायचं आहे का? आजपासूनच सुरू करा हे उपाय, लगेच फरक दिसू लागेल सिगरेट पासून दूरच राहणं चांगलं आहे. कारण, सिगारटेमुळे फुफ्फुसांचं नुकसान होतं आणि कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो. धूम्रपान केल्यामुळे फुफ्फुसांचं नुकसान होतं, फुफ्फुसांचे आजार उद्भवतात. सिगरेट मध्ये अनेक केमिकल्स असतात. ज्यामुळे शरीरावर अत्यंत गंभीर परिणाम होतात. सिगरेट पिण्याचे अनेक तोटे शरीराला सहन करावे लागतात. अनेकजण टेन्शन आलं की सिगरेट पितात. पण ते चुकीचे आहे. असतात. सिगरेट मुळे संपूर्ण शरीर आतून पोकळ होतं. त्यामुळे जर तुम्हालाही सिगरेट ओढण्याची सवय असेल तर आताच सोडा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.