जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / चुरा होईल म्हणून नाही तर 'या' कारणामुळे चिप्सच्या पॅकेटमध्ये भरला जातो स्पेशल गॅस, वाचा सविस्तर

चुरा होईल म्हणून नाही तर 'या' कारणामुळे चिप्सच्या पॅकेटमध्ये भरला जातो स्पेशल गॅस, वाचा सविस्तर

Representational image. Reuters

Representational image. Reuters

चिप्सच्या पाकिटामध्ये गॅसचा (gas in chips packet) वापर ‘या’ कारणासाठी केला जातो आणि त्याचा गॅसही वेगळा असतो. जाणून घ्या चिप्सच्या पाकिटात कोणता गॅस भरला जातो आणि तो का भरण्यात येतो.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 27 फेब्रुवारी: चिप्स (Chips) म्हणजे सर्वांचा आवडता पदार्थ. तुमच्या ही बाब लक्षात आली असेलच की चिप्सची पाकिटं खूप फुगलेली असतात आणि पाकिट उघडल्यानंतर त्यातून हवा बाहेर पडते. चिप्सच्या पाकिटमध्ये चिप्स कमी आणि हवा जास्त असते. अनेकांना असा समज आहे आहे, की गॅसचा वापर चिप्स तुटू नयेत म्हणून केला जातो; पण तसं नाही. चिप्सच्या पाकिटामध्ये गॅसचा (gas in chips packet) वापर इतर कारणांसाठी केला जातो आणि त्याचा गॅसही वेगळा असतो. जाणून घ्या चिप्सच्या पाकिटात कोणता गॅस भरला जातो आणि तो का भरण्यात येतो. चिप्स पॅकेट्समध्ये कोणता वायू असतो आणि तो का भरला जातो? चिप्सच्या पाकिटांमध्ये नायट्रोजन वायू (nitrogen gas in chips packet) भरला जातो. त्या पाकिटांमध्ये फक्त नायट्रोजन वायू भरण्यामागे विशेष कारण आहे. नायट्रोजन वायू रंगहीन, गंधहीन असतो आणि त्याला कोणत्याही प्रकारची चव नसते. तसंच त्याची प्रतिक्रियाशीलताही कमी असते. त्यामुळे चिप्सच्या पाकिटमध्ये नायट्रोजन गॅस भरणं सुरक्षित असतं. नायट्रोजन वायू भरल्यामुळे चिप्स पाकिटांची वाहतूक करणंदेखील सोपं होतं. तसंच, यामुळे चिप्स जास्त काळ कुरकुरीत राहतात. हे वाचा- ‘440 व्होल्टचा करंट’ बसला असं म्हणतो खरं, पण वीजेचा एवढा झटका बसला तर काय होईल? चिप्सच्या पाकिटमध्ये हवा भरण्यामागे आणखी एक वैज्ञानिक सिद्धांत आहे. ऑक्सिजन हा अतिशय प्रतिक्रियाशील वायू मानला जातो. तो कोणत्याही कणासह लवकर मिसळून जातो. ऑक्सिजन रिअॅक्टिव्ह झाल्यामुळे बॅक्टेरिया वाढतात. तुम्ही पाहिलं असेल, की उघड्यावरचे पदार्थ लवकर खराब होतात. नायट्रोजन हा ऑक्सिजनपेक्षा कमी प्रतिक्रियाशील वायू असतो. त्यामुळे चिप्सच्या पाकिटात नायट्रोजन वायू भरला जातो आणि चिप्स अधिक काळ टिकतात. हे वाचा- सकाळी उठल्यानंतर अनेकांच्याकडून होतात या चुका; वेळीच ओळखा आरोग्याला होणारे अपाय चिप्सचे विविध ब्रँड (Chips Company) आहेत आणि 10, 20, ते 80, 100 रुपयांपर्यंतच्या किमतीत चिप्सची पाकिटं मिळतात. या चिप्सच्या पाकिटात किती वायू भरला जातो, यासंदर्भात eattreat नावाच्या वेबसाइटने चिप्सच्या पाकिटावर एक प्रयोग केला आहे. 25 रुपयांपेक्षा कमी दराने विकल्या जाणाऱ्या पाकिटावर एक प्रयोग केल्यानंतर असं आढळून आलं, की Lays च्या चिप्सच्या पाकिटामध्ये 85 टक्के नायट्रोजन वायू भरलेला असतो. अंकल चिप्सच्या एका पाकिटामध्ये 75 टक्के नायट्रोजन वायू असतो. तसंच, बिंगो मॅड अँगलची चिप्स पाकिटं 75 टक्के नायट्रोजन वायूने भरलेली असतात. विचार करून पाहा, समजा ज चिप्सच्या पॅकेटमध्ये हवा भरलेली नसती तर फॅक्टरीमधून चिप्स तुमच्या हातात येईपर्यंत त्याचा पूर्ण चुरा झाला असता किंवा ते खराब झाले असते. असे चिप्स खायला कोणालाच आवडलं नसतं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात