दिल्ली,26 जुलै : हे जग अनेक आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेलं आहे. इतक्या वित्र गोष्टी (Weird Things) या पृथ्वीतलावर आहेत की, आपण विचारही करू शकत नाही. निसर्गाने (Nature) निर्मिती केलेल्या कीही अशाच भयंकर गोष्टींमुळे कधीकधी जिवावरचा धोका निर्माण होतो. तुम्ही जंगलात फिरायला गेले आहात मस्त निर्गाचा आनंद घेत आहात आणि तुमचा स्पर्श एखाद्या विषारी झाडाला झाला तर, कसं वाटेल विचार करा. ऑस्ट्रेलियात (Australia) आढळणारं हे विषारी झाड एतक्या वेदना देत की, ज्याला त्याचा स्पर्श होतो. तो माणून आत्महत्येचा (Suicide) विकार करायला लागतो. हिरव्या रंगाच्या या झाडावर हजरो सुक्ष्म काटे असतात. त्यामुळे ते कोटे टोचल्यानंर बाहेरही काढता येत नाहीत आणि जोपर्यंत निघत नाहीत तोपर्यंत वेदना देत राहतात. त्या झाडाचं नाव आहे. जिमपाई जिमपाई (Gympie Gympie) याची पानं बदामाच्या आकाराची असतात. पण, ही पानं हार्ट अटॅक येण्यासाठी पुरेशी असतात. ऑस्ट्रेलियात आढळणाऱ्या या रोपाला जगातल्या भयानक रोपांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. ( कोणत्या वयात आणि कसा होतो संधीवात? पुरूषांपेक्षा महिलांना असतो जास्त त्रास ) वैज्ञानिक नाव **डॅन्ड्रोक्नाइड मोरॉइड्स (Dendrocnide Moroides) या रोपाचं वैज्ञानिक नाव **डॅन्ड्रोक्नाइड मोरॉ**इड्स (**Dendrocnide Moroides) आहे. याला जिमपाई जिमपाई म्हटलं जातं. याला हृदयाच्या आकाराची छोटीशी पानं असतात. पानांवर आणि झाडांवर अतिशय सूक्ष्म काटे असतात. हे काटे प्रचंड विषारी असतात. एखाद्या व्यक्तीला चुकूनही हा काटा टोचला तर याचं विष एखाद्या विंचवाच्या विषाप्रमाणे वेदना देतं. या काट्यांमध्ये असणाऱ्या विषाला न्यूरोटॉक्सिन म्हटलं जातं. क्वीन्सलॅन्ड पार्क्स एन्ड वाईल्डलाईफ सर्विसेज चे सीनियर कंजर्वेशन ऑफिसर अर्नी राइडर सागंतात या झाडाला एकदा स्पर्श झाला तरी त्याच्या वेदना वर्षभर राहू शकतात. ( जुने कपडे दान करून मिळवा मोठा फायदा; पाहा काय आहे ‘रेमंड’ची नवी एक्सचेंज ऑफर ) वर्षभर होतात वेदना या विषारी रोपाचा एक काटा टोचल्यानंतर असह्य वेदना व्हायला लागतात. दोन तासात प्रचंड वाईट अवस्था होते. हळूहळू माणूस शुद्ध हरपून जातो. अंगात वेदना आणि सूज येऊन त्वचा लाल होते. बऱ्याच वेळा या वेदना काही दिवसांनी कमी होतात. ( काय? आता Fart मुळेही कोविडचा धोका! ढुसकी सोडली तरी पसरू शकतो कोरोना? ) मात्र, काहीना महिनाभर किंवा वर्षभर देखील हा त्रास होऊ शकतो. या वेदना इतक्या तीव्र असतात की त्या व्यक्तीच्या मनात आत्महत्या करण्याचे विचार यायला लागतात. यामुळेच या झाडाला सुसाईड प्लान्ट (suicidal Plant) म्हटलं जातं. रोपावरच्या काट्यां मधलं विष आपल्या टी शूज मध्ये पोहोचल्यानंतर भयंकर त्रास व्हायला लागतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.