मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

World Smile Day : संशोधक म्हणतात, हसण्याच्या बाबतीत महिला अव्वल; तुम्हाला काय वाटतं?

World Smile Day : संशोधक म्हणतात, हसण्याच्या बाबतीत महिला अव्वल; तुम्हाला काय वाटतं?

आज वर्ल्ड स्माइल डे.

आज वर्ल्ड स्माइल डे.

पुरुषांपेक्षा महिला जवळपास आठपट जास्त स्मितहास्य करतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Priya Lad

मुंबई, 07 ऑक्टोबर : 'तेरा मुस्कुराना गजब हो गया' असं म्हणत प्रेयसीच्या स्मितहास्यासाठी (Smile) प्रियकर कायम तिची मनधरणी करत असतो. पण प्रत्यक्षात महिलांचं हसणं (Smiling) पुरुषांपेक्षा किती तरी जास्त असतं. हे आपण नेहमी अनुभवतो आणि आता संशोधनातही ते सिद्ध झालं आहे. दिवसभरात पुरुषांपेक्षा महिला जवळपास आठपट जास्त स्मितहास्य (Woman smiling more than men) करतात.

'येल रिसर्च'च्या (Yale Research) माहितीनुसार, महिलांच्या चेहऱ्यावर दिवसभरात सरासरी 62 वेळा स्मितहास्य (Smile) असतं, तर पुरुषाच्या चेहऱ्यावर दिवसभरात सरासरी आठ वेळा स्मितहास्य असतं. महिला-पुरुष जेव्हा तरुण आणि खासकरून किशोरवयात असतात, तेव्हा त्यांच्या स्मितहास्याच्या प्रमाणात खूप मोठा फरक असतो. प्रौढ झाल्यानंतर हा फरक कमी होतो, असं हे संशोधन सांगतं.

महिला-पुरुषांच्या स्माइलच्या प्रमाणात फरक असण्याची अनेक कारणं सांगण्यात आली आहेत. महिला मुळातच एक्स्प्रेसिव्ह (Expressive) असतात. म्हणजेच त्यांचं भावना व्यक्त करण्याचं प्रमाण जास्त असतं. त्या निसर्गतःच भावनाप्रधान (Emotional) असतात आणि त्या व्यक्त करतात. स्माइलसाठी चेहऱ्यावर आवश्यक असलेले स्नायू त्यांच्या जन्मतःच चांगले असतात आणि नंतरही ते चांगल्या प्रकारे विकसित होतात. आणखी एक कारण म्हणजे महिला पुरुषांसारख्या सोशली डॉमिनंट (Socially Dominant) म्हणजे अधिकार गाजवणाऱ्या नसतात. वय, संस्कृती, वंश अशा अनेक बाबींवरही महिलांच्या स्माइलचं प्रमाण अवलंबून असतं.

हे वाचा - अकेले हैं तो क्या गम है...! सिंगल राहिल्यानं तणाव राहतो कमी, आरोग्याला मिळतात हे मोठे फायदे

जेव्हा सत्तेत, सामाजिक कार्यात किंवा नोकरी-व्यवसायात महिलांना पुरुषांच्या बरोबरीचं स्थान मिळतं, तेव्हा स्माइलच्या प्रमाणाचा हा लिंगआधारित फरक नाहीसा होतो. तरीही एक फरक असतो. तो म्हणजे जेव्हा ताण जास्त असतो, तेव्हा स्त्रिया जास्त हसतात. त्यातून ताण कमी करण्याचा प्रयत्न करतात. महिला दुखावलेल्या असतात, तेव्हा स्मितहास्याद्वारे सावरण्याचा, शांतता पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. अशी निरीक्षणं संशोधनादरम्यान नोंदवली गेली आहेत.

महिलांच्या स्मितहास्याचं प्रमाण जास्त आहे, हे वरच्या अनेक उदाहरणांतून लक्षात आलं आहे. तरीही स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक आनंदी असतात, असा मात्र याचा अर्थ नाही. महिला मुळातच एक्स्प्रेसिव्ह स्वभावाच्या असतात. त्यात भावनाप्रधान स्वभाव, संस्कृती आणि संदर्भ आदी कारणंही त्यांच्या हास्यामागे असतात.

हे वाचा - वाचाल तर वाचाल अन् नवीन शिकाल, ज्ञान संपन्नही व्हाल; जाणून घ्या वाचनाचे काय आहेत फायदे

पुरुष सहसा व्यक्त होत नाहीत. कारण त्यांनी मोकळेपणाने व्यक्त होण्याकडे विचित्र तऱ्हेने पाहिलं जातं. त्यामुळेच एखादा दुःखाचा प्रसंग असला तरीही महिला रडून मोकळ्या होतात. पण मोकळेपणाने रडणारे पुरुष मात्र कमीच असतात. हेच कारण त्यांच्या खूप न हसण्यामागेही आहे, असं संशोधन सांगतं.

पुरुषांनी त्यांच्या खऱ्या भावना व्यक्त करण्यात मागे-पुढे पाहू नये. त्यांनी मोकळेपणाने व्यक्त व्हावं. जास्त हसणं हे नेहमी फायद्याचंच असतं, असा सल्ला शास्त्रज्ञांनी पुरुषांना दिला आहे.

First published:

Tags: Lifestyle, On this Day