नवी दिल्ली, 05 ऑक्टोबर : बहुतेक लोकांचा असं वाटतं की, एखाद्या व्यक्तीला निरोगी जीवन जगण्यासाठी जोडीदाराची आवश्यकता असते, विशेषत: वृद्धापकाळात त्याच्यासोबत कोणीतरी असणे आवश्यक असते. अनेक अभ्यास आणि साइट्सने देखील हे सिद्ध केलं आहे की, आनंदी राहण्यासाठी कोणाचा तरी आधार आवश्यक आहे. पण, अविवाहित राहणंही काही वाईट नसतं. अविवाहित लोकांनी ठरवलं तर ते जास्त आनंदी राहु शकतात. आपल्याकडे अविवाहित राहण्याच्या फायद्यांविषयी फार कमी बोललं जातं किंवा अविवाहित व्यक्तीला नैराश्याचा बळी समजतात. उलट सिंगल राहण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत, जे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. माणसाने अविवाहित का राहावे? हा पहिला प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो. समाजात आणि कुटुंबात इतकी माणसे असताना आपण अविवाहित का राहायचे? अविवाहित राहण्याचे आरोग्य फायदे जाणून घेऊया. माणसाने अविवाहित का राहावे? अविवाहित राहणे सोपे नाही हे मान्य. पण ते तितकेसे वाईटही नाही. ओन्ली माय हेल्थ च्या माहितीनुसार, जोडीदार असण्याचा अर्थ असा आहे की, त्या व्यक्तीकडे एक सपोर्ट सिस्टम आहे, जी त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करते. पण, एकत्र राहिल्याने कधी कधी नात्यात भांडणे, वाद, नात्यात दुरावा, अशी परिस्थिती निर्माण होते ज्यामुळे नातं बिघडू शकतं. मात्र, अविवाहित व्यक्ती केवळ मित्रच नाही तर कुटुंबालाही एकत्र ठेवते. अविवाहित लोकांकडे चांगले नेटवर्क असते, ते लोक त्यांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असतात. दुसरीकडे, जे लोक कोणत्याही नातेसंबंधात नाहीत ते त्यांच्या कामावर आणि करिअरकडे अधिक लक्ष केंद्रित करतात. तसेच त्यांची तणावाची पातळीही कमी असते.
ताण कमी - जे लोक अविवाहित राहतात त्यांच्या जीवनात फार कमी ताण असतो. हे केवळ नातेसंबंधांमुळे नाही तर इतर कारणांमुळे घडते. विशेषतः आर्थिक ताण इतरांपेक्षा कमी असतो. अविवाहित राहिल्याने अतिरिक्त खर्च होत नाही, खर्चही सांगावा लागत नाही तसेच खिशाचा भारही कमी होतो. हे वाचा - विजयादशमीला नक्की खा हे 5 गोड पदार्थ, वर्षभरासाठी मिळेल गूड लक स्वतःसाठी वेळ मिळतो - कुटुंब आणि जोडीदारासोबत राहून एखादी व्यक्ती स्वत:साठी क्वॉलिटी टाईम काढू शकत नाही. मात्र, अविवाहित लोक स्वतःसाठी वेळ काढू शकतात ज्यामध्ये जिम, व्यायाम आणि वैयक्तिक ग्रूमिंग करता येते. यामुळे लठ्ठपणा, हृदयाच्या समस्या आणि बीपी यांसारख्या अनेक आजारांचा धोका कमी होऊ शकतो.