मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

आपल्या चेहऱ्यावर भुवया का असतात? कारण आहे खूपच खास

आपल्या चेहऱ्यावर भुवया का असतात? कारण आहे खूपच खास

माणसाच्या पूर्ण शरीरावर केस (Hair) असतात. या केसांचा काही उपयोग नाही, ते आपलं सौंदर्य कमी करतात, असं बर्‍याचदा लोकांना वाटतं; पण हे मत पूर्णपणे चुकीचं आहे.

माणसाच्या पूर्ण शरीरावर केस (Hair) असतात. या केसांचा काही उपयोग नाही, ते आपलं सौंदर्य कमी करतात, असं बर्‍याचदा लोकांना वाटतं; पण हे मत पूर्णपणे चुकीचं आहे.

माणसाच्या पूर्ण शरीरावर केस (Hair) असतात. या केसांचा काही उपयोग नाही, ते आपलं सौंदर्य कमी करतात, असं बर्‍याचदा लोकांना वाटतं; पण हे मत पूर्णपणे चुकीचं आहे.

मुंबई, 18 जून : माणसाच्या पूर्ण शरीरावर केस (Hair) असतात. या केसांचा काही उपयोग नाही, ते आपलं सौंदर्य कमी करतात, असं बर्‍याचदा लोकांना वाटतं; पण हे मत पूर्णपणे चुकीचं आहे. शरीरावरील केस हे त्वचा आणि आपल्या अवयवांचं रक्षण करण्यासाठी असतात. आपल्या डोळ्यांवर पापण्या असतात आणि भुवयाही (eyebrows) असतात. त्यामुळे डोळ्यांचं रक्षण करण्यासाठी पापण्या असतील तर भुवया कशासाठी? (why do we have eyebrows?) त्याचा उपयोग काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

भुवया माणसाला खूप उपयोगी आहेत. मानवी शरीराशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या निसर्गाने त्याला दिल्या आहेत. त्या गोष्टी काहीच कामाच्या नाहीत, असं आपल्याला वाटतं. पण त्या शरीरासाठी खूप महत्वाच्या असतात. यामध्ये भुवयांचा समावेश होतो. भुवया लोकांना संवाद साधण्यास मदत करतात. आता तुम्ही म्हणाल की आपण तर बोलून संवाद साधतो, त्यात भुवयांचं काय काम? तर, आपण जेव्हा तोंडाने संवाद साधतो तेव्हा आपल्या देहबोलीचाही त्यात समावेश असतो. भुवयांची हालचाल हा देहबोलीचा भाग आहे.

(मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये मोठी राजकीय घडामोड, एकनाथ खडसे आणि राम शिंदे यांची भेट)

भावना व्यक्त करण्यास होते मदत

भुवयांच्या मदतीने आपण आपल्या मूडबद्दल (Mood) सांगू शकतो. म्हणजे आपण चिडलोय, खूश आहोत की आश्चर्यचकित झालोय हे आपल्याला भुवयांच्या हालचाली करून समोरच्या व्यक्तीला सांगता येतं. म्हणजेच आपण न बोलताही आपल्या भुवया बऱ्याचदा आपल्या भावना व्यक्त करण्यास मदत करतात. भारतातील अनेक नृत्य (Dance) प्रकारांमध्ये भुवयांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. त्या नृत्यांमध्ये चेहऱ्यांवरील हावभावांतून कथा व्यक्त केली जाते. भुवयांवरून आपण एखाद्या व्यक्तीला ओळखू शकतो. जाड, पातळ, जोडलेल्या भुवया ही माणसांची ओळख बनतात.

भुवया डोळ्यांचं करतात रक्षण

आता भुवयांचं एक्सप्रेशन (Expression) म्हणजेच हालचालीबद्दल आपलं बोलून झालंय. आता आपण भुवयांच्या सर्वांत महत्वाच्या कामाबद्दल बोलूयात. भुवयांचं सर्वांत महत्वाचं काम आहे डोळ्यांचं रक्षण करणं. आपल्या भुवया डोळ्यांचं रक्षण करतात. भुवयांची रचना अशी आहे की जेव्हा कपाळावर घाम येतो तेव्हा भुवयांच्या डिझाइनमुळे तो घाम डोळ्यांशेजारून वाहतो. जर, भुवया नसतील तर तो घाम थेट डोळ्यांवर येईल. त्याचप्रमाणे भुवया डोळ्यांवर थेट पाणी पडण्यापासून रोखतात. याशिवाय, सूर्य तापलेला असतो तेव्हा भुवया देखील त्या सूर्याची किरणं थेट आपल्या डोळ्यांवर पडण्यापासून रोखतात.

अशा रितीने भुवया आपल्याला भावना व्यक्त करण्यास आणि डोळ्यांचे रक्षण करण्यास मदत करतात. त्यामुळे त्या महत्त्वाच्या आहेत.

First published: